ETV Bharat / business

गोपनीयतेचे धोरण स्वीकारले नाही, तरी सेवा पूर्ण मिळणार - व्हॉट्सअपचा पुनरुच्चार

author img

By

Published : Jun 3, 2021, 9:42 PM IST

व्हॉट्सअपने बदललेल्या धोरणाचा वापरकर्त्यांच्या वैयक्तिक संदेशाच्या गोपनीयतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे नुकतेच व्हॉट्सअपने म्हटले आहे. वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या धोरणाला सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याचे व्हॉट्सअपने केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

व्हॉट्सअप
व्हॉट्सअप

नवी दिल्ली - जे वापरकर्ते नवीन गोपनीयतेची अट स्वीकारणार नाहीत, त्यांच्यासाठीही व्हॉट्अपची सुविधा मर्यादित राहणार नाही. ही माहिती व्हॉट्सअपने दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. मात्र, वापरकर्त्यांना व्हॉट्सअप अपडेट करण्याबाबत कळविण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

वैयक्तिक डाटा संरक्षण कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी व्हॉट्सअपकडून वापरकर्त्यांची बळाने परवानगी घेत असल्याचे केंद्राने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. त्यावर वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे भारत सरकारला कळविल्याची माहिती व्हॉट्सअपच्या प्रवक्त्याने दिली आहे.

हेही वाचा-बँकांना विजय मल्ल्याची 5,646 कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याचा मार्ग मोकळा

वापरकर्त्यांना धोरण अपडेटचे रिमाईंडर मिळत राहणार-

व्हॉट्सअपच्या प्रवक्त्याने म्हटले, की नवे व्हॉट्सअपचे धोरण अपडेट नाही केले तरी वापरकर्त्यांचे अकाउंट डिलीट होणार नाही. त्यामुळे धोरण (पॉलिसी) अपडेट न करणाऱ्या कोणत्याही भारतीयाचे अकाउंट बंद पडणार नाही. मात्र, आम्ही पुढील काही आठवडे लोकांना धोरण अपडेट करण्याची आठवण (रिमाईंडर) देत राहणार आहोत, असेही प्रवक्त्याने म्हटले आहे. बहुतांश वापरकर्त्यांनी नव्या अटी स्वीकरून व्हॉट्सअप धोरण अपडेट केले आहे. तर काही लोकांना धोरण अपडेट करण्याची संधी मिळाली नव्हती.

हेही वाचा-भारत बायोटेकची ओक्युजेनबरोबर भागीदारी; कॅनडामध्येही कोव्हॅक्सिनची होणार विक्री

काय आहे व्हॉट्सअपच्या अपडेटचा वादग्रस्त मुद्दा?

केंद्र सरकारने व्हॉट्सअपला गोपनीयतेचे धोरण मागे घेण्याची सूचना केल्यानंतर कंपनीने भूमिका स्पष्ट केली होती. प्रस्तावित गोपनीयेतच्या धोरणातून वापरकर्त्यांचा डाटा फेसबुकशी वापर करण्याबाबत कोणताही बदल होणार नाही. त्या मुद्द्याबाबत असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी खुले असल्याचे कंपनीने म्हटले होते. व्हाट्सअपकडून डाटावर कशी प्रक्रिया केली जाते. डाटा कसा स्टोअर केला जातो, आदी बाबीबाबत धोरण बदलण्यात येत आहे. हे अपडेट ८ फेब्रुवारीपासून लागू होणार होते. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. फेसबुकच्या अटी मान्य केल्यानंतर हे अपडेट होणार आहे.

व्हॉट्सअपने गोपनीयतेच्या धोरणात बदल करण्याचे जाहीर केल्यावर भारतासह जगभरातून फेसबुक कंपनीवर टीका करण्यात आली होती. व्हॉट्सअपचा डाटा फेसबुकची मालकी असलेल्या इतर कंपन्यांकडे सामाई केला जाईल, अशी जगभरातील वापरकर्त्यांमध्ये भीती आहे. असे असले तरी व्हॉट्सअपवरील संदेश हे इन्ड-टू-इन्ड इन्क्रिप्टेड असल्याचे व्हॉट्सअपची मालकी असलेल्या फेसबुकने जाहीर केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.