सॅनफ्रान्सिस्को - व्हॉट्सअॅपने अफवांना आळा घालण्यासाठी नवीन फीचर सुरू केले आहे. हे फीचर ब्राझील, इटली, आयर्लंड, मेक्सिको, स्पेन, इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये उपलब्ध केले आहे.
व्हॉट्सअॅपचे नवीन वैशिष्ट्य हे नवीन अँड्राईड, आयओएस आणि व्हॉट्सअॅप वेबवर उपलब्ध होणार आहे.
हे आहे नवे फीचर-
नव्या फीचरमध्ये वापरकर्त्याला ब्राउझरमधून व्हॉट्सअपमध्ये संदेश अपलोड करता येणार आहे. त्यासाठी त्यांना हा संदेश व्हॉट्सअपमध्ये पाहण्याची गरज लागणार नाही. हे फीचर सर्च वेब या नावाने सुरू करण्यात आले आहे.
हे फीचर कधी सुरू होणार हे कंपनीने अद्याप जाहीर केले नाही. ते भारतात लवकर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. जर एखादा संदेश किमान पाच जणांना पाठविला तर त्यावर मॅग्नीफाईंग ग्लासचे चिन्ह दाखविले जाणार आहे. त्याबाबतच्या संदेशाबाबतची माहिती व्हॉट्सअपवर वापरकर्त्याला शोधता येणार आहे.
एकाचवेळी विविध साधनांमधून एकाच खात्यातून व्हॉट्सअॅप सुरू ठेवता येणार आहे. या फीचरवर कंपनीकडून काम सुरू आहे.