ETV Bharat / business

देशातील अ‌ॅमेझॉन प्राईममध्ये दुप्पट गुंतवणूक करणार - जेफ बेझोस

सर्व जग हे दूरचित्रवाहिनीचे सोनेरी वर्ष अनुभवत असल्याचेही अब्जाधीश बेझोस यांनी सांगितले. जगभरात अ‌ॅमेझॉनचे स्टुडिओ असावेत, अशी अपेक्षा असल्याचे जेफ यांनी सांगितले.

Jeff, Shahrukh Khan & Zoya Akhtar
जेफ, शाहरुख आणि झोया अख्तर
author img

By

Published : Jan 17, 2020, 4:10 PM IST

मुंबई - प्राईम इंडिया अपेक्षेहून चांगली कामगिरी करत असल्याचे अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्ट्रीमिंग सेवा असलेल्या अ‌ॅमेझॉन प्राईममध्ये दुप्पट गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. ते मुंबईमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

जेफ बेझोस यांनी बॉलीवूडमधील सुपरस्टार शाहरूख खान आणि दिग्दर्शक झोया अख्तर यांची भेट घेवून संवाद साधला. जेफ यांची ही मुंबईतील पहिलीच भेट आहे. प्राईम व्हिडिओला जगात सर्वाधिक भारतात प्रतिसाद मिळत असल्याचे बेझोस यांनी शाहरूख व झोया यांच्याशी बोलताना सांगितले.

पुढे ते म्हणाले, जगात सर्वात मोठे पुस्तकांचे ऑनलाईन दुकान सुरू करण्यासाठी अ‌ॅमेझॉनची १९९४ मध्ये सुरुवात केली. पुस्तके परवडणाऱ्या दरात मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, एवढा प्रचंड व्यवसाय होईल, असे वाटले नव्हते. यावेळी खास भारतीयांसाठी असलेले प्राईम व्हिडिओचे ७ शो लाँच केले.

हेही वाचा-पियूष गोयल यांच्या वक्तव्यानंतर अ‌ॅमेझॉनने 'ही' केली घोषणा

सर्व जग हे दूरचित्रवाहिनीचे सोनेरी वर्ष अनुभवत असल्याचेही अब्जाधीश बेझोस यांनी सांगितले. जगभरात अ‌ॅमेझॉनचे स्टुडिओ असावेत, अशी अपेक्षा असल्याचे जेफ यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या सुफी गायनाचा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाला रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनिलिया, विद्या बालन आणि तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर, अर्शद वारसी, राजकुमार राव व आशुतोष गोवारीकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा-इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून मागितले उत्तर

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.