नवी दिल्ली - देशातील शेतकरी उत्पादनासाठी गहू आणि तांदळापुरते मर्यादित होऊ नयेत. यासाठी पर्याय विकसित करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना केले आहे. ते अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीवर वेबिनारमध्ये बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांना असे पर्याय द्यावेत, जेणेकरून ते गहू आणि तांदळापुरत मर्यादित राहू नयेत. आपण सेंद्रिय अन्न आणि भाजीपाल्यांसारख्या अनेक गोष्टी करू शकतो. पिकांमध्ये वैविध्यता नसल्याने शेतकरी समुदायाची प्रगती थांबल्याची टीका होत असते. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानाचे वक्तव्य महत्त्पूर्ण मानले जाते.
हेही वाचा-शेअर बाजारात ७५० अंशांची तेजी; जीडीपीच्या सकारात्मक अंदाजाचा परिणाम
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?
- केंद्र सरकारने चालू वर्षात कृषी क्षेत्रासाठी वित्तपुरवठा करण्याचे प्रमाण १५ लाख कोटी रुपयांहून १६.५ टक्के केले आहे.
- लहान आणि अल्पभूधारक शेतकरी हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतात.
- केंद्र सरकारने १२ कोटी लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात कृषी स्टार्टअपने चांगले काम केले आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.
देशामध्ये पीक लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी गहू आणि तांदळाच्या क्षेत्राचा मोठा हिस्सा आहे. तर देशातील एकूण पीक उत्पादनात ७८ टक्के गहू आणि तांदळाचा हिस्सा आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताला तेलबिया आणि डाळींसाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते.
हेही वाचा-घराचे स्वप्न साकारणे सुलभ; स्टेट बँकेकडून व्याजदरात कपात