वॉशिंग्टन - अमेरिकन सरकारने चीनच्या सुमारे 33 कंपन्यांवर निर्यात आणि व्यापार करण्यावर निर्बंध लागू केले आहेत. या कंपन्यांकडून चीनच्या सैन्यदलाला तंत्रज्ञान पुरविले जाते, असे अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने म्हटले आहे. तसेच मानवाधिकारंचे उल्लंघन होत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
पश्चिम चीनमध्ये शिनजियाँग वूघुर या ठिकाणी मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने शुक्रवारी म्हटले आहे. त्यामध्ये 9 चिनी कंपन्यांचा संबंध असल्याचे या विभागाने म्हटले आहे. तर सात कंपन्यांकडून चीनच्या सैन्यदलाला देखरेख ठेवण्यासाठी तंत्रज्ञान दिले जात असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
हेही वाचा-'विकासदर उणे राहणार असताना आरबीआयने चलन तरलतेचा निर्णय का घेतला?
याशिवाय 24 चिनी व्यापारी आणि सरकारी कंपन्यांवरही निर्बंध लागू केले आहेत. या कंपन्यांकडून चीनच्या सैन्यदलाला खरेदी करण्यासाठी मदत करण्यात येते. त्या कंपन्यांकडून धोका असल्याने त्यांच्यावरही अमेरिकेने निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
हेही वाचा-येस बँक घोटाळा : वाधवान पिता-पुत्राच्या ईडी कोठडीत 27 मेपर्यंत वाढ
अमेरिकेने चीनमधील ३३ कंपन्यांना व्यवसाय आणि निर्यात करण्यासाठी काळ्या यादीत टाकले आहे. या कंपन्यांकडून देशाच्या सुरक्षेला आणि परराष्ट्र धोरणाला धोका असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकन कंपन्यांनी त्यांच्या जोखीमवर व्यवसाय करावा, असे अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने म्हटले आहे. त्यासाठी अमेरिकन कंपन्यांना तुरुंग अथवा दंड ठोठावला जावू शकतो, असे संकेतही वाणिज्य विभागाने दिले.
हेही वाचा-कोरोनाशी 'भारतीय पोस्ट'चा लढा; २ हजार टन औषधांसह साधनांची डिलिव्हरी
ट्रम्प प्रशासनाने चिनी कंपन्यांवर निर्बंध लागू करत बीजिंगवर कायम दबाव टाकणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, कोरोनाचा विषाणू जगभरात पसरल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केला आहे. यावरून चीन व अमेरिकेत तणावाचे संबंध आहेत.