ETV Bharat / business

ट्विटरने सुरू केले 'या' सहा क्षेत्रांतील व्यक्तींकरिता ब्ल्यू स्टिक व्हेरिफेकिशन - micro blogging platform twitter

येत्या काही आठवड्यात प्रत्येकाला नवीन व्हेरिफेकेशनचा पर्याय अकाउंट सेटिंग टॅबमध्ये मिळणार आहे. प्रत्येकाच्या अप्लिकेशनचे वेळेवर पुनरावलोकन करण्याची आम्ही खात्री देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ट्विटरने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.

ट्विटर
ट्विटर
author img

By

Published : May 22, 2021, 7:24 PM IST

नवी दिल्ली - ट्विवटरवर प्रोफाईलला असलेली ब्ल्यू स्टिक मिळविण्यासाठी अनेकजण प्रतिक्षेत आहेत. ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. ट्विटरने सहा वर्गवारीसाठी जगभरात ब्ल्यू स्टिकचे पुनरावलोकन सुरू केले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना ब्ल्यू स्टिक मिळणे शक्य होणार आहे.

कंपनी, सरकार, ब्रँड आणि संस्था, नवीन संस्था आणि पत्रकार, माध्यम, स्पोर्ट्स आणि गेमिंग, चळवळींमधील कार्यकर्ते, संस्था आणि वैयक्तिक प्रभावी असलेल्या व्यक्तींसाठी ब्ल्यू स्टिक मिळणार आहेत. त्यानंतर काही वर्गवारीसाठी ब्ल्यू स्टिक दिल्या जाणार आहेत. यामध्ये वैज्ञानिक, धार्मिक नेते व तज्ज्ञ यांचा समावेश आहे. येत्या काही आठवड्यात प्रत्येकाला नवीन व्हेरिफेकेशनचा पर्याय अकाउंट सेटिंग टॅबमध्ये मिळणार आहे.
हेही वाचा-भारतीय कर्मचारी घरातून काम करताना दर आठवड्याला ५ तास वाया घालवितात

असे करावे लागणार अप्लिकेशन

  • प्रत्येकाच्या अप्लिकेशनचे वेळेवर पुनरावलोकन करण्याची आम्ही खात्री देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ट्विटरने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.
  • अप्लिकेशन केल्यानंतर काही आठवड्यात ई-मेलवर प्रतिसाद दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी काही आठवडे लागण्याची शक्यता आहे.
  • जर अप्लिकेशन मंजूर झाले तर आपोआप ब्ल्यू बॅज हा प्रोफाईलला दिसणार आहे.
  • जर अप्लिकेशनमध्ये काही चूक झाली असेल तर ३० दिवसानंतर अप्लिकेशन करता येणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.
  • गेल्या काही आठवड्यांपासून ट्विटरकडून ब्ल्यू बॅजच्या पात्रतेत पारदर्शकता आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यासाठी कंपनीने लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन नवे धोरण जाहीर केले आहे. या नव्या धोरणानुसार माहिती अपडेट नसेल तर पूर्वीच्या प्रोफाईल पेजवरील ब्ल्यू बॅजेसही काढण्यात येणार आहेत.
  • नव्या अटीनुसार तुमचे अकाउंट पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचे प्रोफाईल नाव, प्रोफाईल इमेज आणि अधिकृत फोन आणि ई-मेल असणे आवश्यक आहे.
  • तसेच ब्ल्यू बॅजला अप्लिकेशन करण्यापूर्वी सहा महिने खाते सक्रिय असणे आवश्यक आहे.
  • त्या कालावधीमध्ये ट्विटरच्या नियमांचे पालन केलेले असावे.

हेही वाचा-दोन तासांत डिलिव्हरी देणारे अॅमेझॉन प्राईम नाऊ होणार बंद; 'हा' मिळणार पर्याय

संकटाच्या काळात ट्विटरकडून भारताला मदत

दरम्यान, भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना ट्विटरने मदतीचा हात दिला आहे. मायक्रोब्लॉगिंग कंपनी ट्विटरने भारतामधील तीन एनजीओला कोरोनाच्या संकटात १५ दशलक्ष डॉलरची नुकतेच मदत केली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डोर्से यांनी ट्विट करत तीन एनजीओंना मदत केल्याचे जाहीर केले. केअर, एअर इंडिया आणि सेवा इंटरनॅशनल युएसए या तीन एनजीओंची नावे आहेत. ट्विटरचे सीईओ यांनी एड इंडियाला १० दशलक्ष डॉलर तर सेवा इंटरनॅशनल आणि एड इंडियाला २.५ दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.