नवी दिल्ली -अमेरिकेची ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हिकल एलएलसी कंपनीही भारतीय बाजारात येणार आहे. या कंपनीची इलेक्ट्रिक कार ही टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारहून अधिक चांगली असल्याचे केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते.
एमएसएमई उद्योगाचा देशातील जीडीपीत ४० टक्क्यापर्यंत हिस्सा वाढण्याची गरज केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की जग हे आता चीन सोडून भारताला पसंती देत आहे. आपल्याला जीडीपी आणि कृषीचा विकासदर वाढविण्याची गरज आहे. आपण भारताला जगामधील एक बळकट अशी अर्थव्यवस्था असलेला देश बनवू शकतो, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-देशाच्या राजधानीत बेरोजगारीने गाठला कळस; मेमध्ये 45.6 टक्क्यांची नोंद
खाद्यतेलाबाबतही भारताने आत्मनिर्भर होण्याची गरजही गडकरी यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले.
हेही वाचा-अदार पुनावाला यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांसह परराष्ट्रमंत्र्यांचे मानले आभार, कारण...
टेस्लाचे भारतात बंगळुरूमध्ये आहे कार्यालय
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी जाहीर केल्याप्रमाणे टेस्लाने भारतात प्रवेश केला आहे. टेस्लाकडून टेस्ला इंडिया मोटार्स आणि इनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची देशात नोंदणी झाली आहे. स्ला कंपनीच्या संचालक पदावर वैभव तनेजा, डेव्हिड जॉन फेनस्टिन आणि वेंकटरंगम श्रीराम यांची निवड करण्यात आली आहे. तर तनेजा हे चीफ अकाउटिंग ऑफिसर म्हणून कंपनीची धुरा सांभाळत आहेत. इलॉन मस्क हे इलेक्ट्रिक सीडान लाँच करणार असल्याची चर्चा आहे. या इलेक्ट्रिक कारची भारतात सुमारे 60 लाख रुपये किंमत असणार आहे. महाराष्ट्र सरकारने पुण्यातील चाकण येथे टेस्लाला प्रकल्प सुरू करण्यासाठी यापूर्वीच आमंत्रित केले आहे.