हैदराबाद – एच-1बी व्हिसावर निर्बंध आणण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात थेट भारतावर आणि आयटी-आयटी सेवा उद्योगांवर होणार आहे. हे मत या आंतरराष्ट्रीय संबंधामधील तज्ज्ञ टी. एस. चंद्रशेखर यांनी व्यक्त केले.
अनेक स्थलांतरित लोक उच्चशिक्षित आहेत. आरोग्याबाबत सजग आणि नव्या पिढीकरता नवे तंत्रज्ञान देत आहेत. जर त्यांना निरुत्साही केले तर भारतावरच नव्हे तर जगभरातील इंटरनेट ऑफ थिंग्जवर परिणाम होणार असल्याची शक्यता चंद्रशेखर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले, की जागतिकीकरण आणि बुद्धिमत्ता यांच्यानंतर संरक्षणवाद आणि भीती असली पाहिजे. भारतीय लोक अमेरिकेचे मायक्रोसॉफ्ट वर्ड्स, गुगल सर्च ते फेसबुक चॅट वापरतात. आपणही आयटी आणि आयटी सेवांचे उत्पादक व ग्राहक आहोत. अमेरिकेने आपली तुलना कोरिया अथवा चीनशी करू नये. एच -वनबी व्हिसाच्या नव्या नियमामधून भारताला वगळावे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
आयटी उद्योगाची संस्था नॅसकॉमने कामांसाठी असलेला व्हिसा रोखण्याची घोषणा ही चुकीच्या माहितीवर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची हानी होणार आहे. कारण, बुद्धिमत्तेची स्थानिक लोक अमेरिकेत उपलब्ध होत नाही.
अमेरिकेच्या घोषणेप्रमाणे एच-1बी व्हिसावर 24 जूनपासून निर्बंध लागू होणार आहेत. त्याचा मोठा परिणाम हा अमेरिकेतील भारतीय आयटी व्यवसायिकांवर होणार आहे. अनेक भारतीय आणि अमेरिकन कंपन्या एच-1बी व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेतात. मात्र, नव्या घोषणेप्रमाणे अमेरिकेकडून आर्थिक वर्ष 2021 साठी देण्यात येणारे एच-1बी व्हिसा 1 ऑक्टोबरपासून देणे थांबविण्यात येणार आहे. दरम्यान, गुगलचे अध्यक्ष सुंदर पिचाई यांनीही अमेरिकेच्या व्हिसाबाबतच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.