नवी दिल्ली - देशातील साखरेच्या उत्पादनात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. या उत्पन्नवाढीने २०२०-२१ या विपणन वर्षातील पाच महिन्यात साखरेचे उत्पादन हे २३३.७७ लाख कोटी रुपये झाले आहे. ही माहिती भारतीय साखर कारखाना संघटने (आयएसएमए-इस्मा) दिली आहे.
सध्या, साखरेची किंमत प्रति किलो ३१ किलो रुपये आहे. ही किंमत वाढवून साखरेची किंमत प्रति किलो ३४.५ रुपये करावी अशी अपेक्षा भारतीय साखर कारखाना संघटनेने व्यक्त केली आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ६०२ रुपयांची घसरण
असे वाढले साखरेचे उत्पादन-
- साखरेचे विपणन वर्ष हे ऑक्टोबर ते सप्टेंबरमध्ये गृहित धरण्यात येते. विपणन वर्ष २०२०-२१ मध्ये साखरेचे उत्पादन हे २३३.७७ लाख टन झाले आहे. तर त्याच्या मागील वर्षात १९४.८२ लाख टन उत्पादन झाले होते.
- ऑक्टोबर २०२० आणि फेब्रुवारी २०२१ कालावधीत साखरेचे उत्पादन हे महाराष्ट्रात वाढून ८४.८५ लाख टन झाले आहे.
- उत्तर प्रदेशमध्ये साखरेचे उत्पादन वाढून चालू वर्षात फेब्रुवारीअखेर ७४.२० लाख टन आहे. तर मागील वर्षात उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन हे ७६.८६ लाख टन होते.
- कर्नाटकमध्ये साखरेचे उत्पादन हे ३२.६० लाख टनांवरून ४०.५३ लाख टन झाले आहे.
हेही वाचा-पेपल भारतामध्ये १ हजार अभियंत्यांना देणार नोकऱ्या
निर्यात करताना इस्मापुढे अडचणी-
चालू वर्षात सरकारने उसाचा एफआरपी हा प्रति क्विटंल १० रुपयांनी वाढविला आहे. तसेच साखरेची एमएसपी वाढून प्रति किलो ३४.५० रुपये करण्याची गरज असल्याचे साखर कारखाना संघटनेने म्हटले आहे. चालू वर्षात साखरेच्या निर्यातीसाठी ट्रक आणि कंटेनरची कमतरता भासत आहे. त्यामुळे त्याबाबत सरकार आणि संबंधित यंत्रणेने निर्णय घेण्याची गरज असल्याचे इस्माने म्हटले आहे.