ETV Bharat / business

जीएसटी रचना होणार आणखी सोपी; केंद्रीय अर्थमंत्र्यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन - CAIT

विविध भागीदारांकडून (स्टेकहोल्डर्स) मिळालेल्या सूचनांप्रमाणे जीएसटी व्यवस्था सोपी करण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

Nirmala Sitaraman
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
author img

By

Published : Jan 8, 2020, 4:15 PM IST

नवी दिल्ली - वस्तू व करात आणखी सोपेपणा आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिले. प्रामाणिक करदात्यांना होणारा त्रास कमी होण्यासाठी पावले उचलल्याचेही त्यांनी सांगितले. त्या अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या (सीएआयटी) कार्यक्रमात बोलत होत्या.

जीएसटी परतावा भरण्याची व्यवस्था आणखी चांगली करण्यासाठी सूचना खुलेपणाने स्वीकारण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. विविध भागीदारांकडून (स्टेकहोल्डर्स) मिळालेल्या सूचनांप्रमाणे जीएसटी व्यवस्था सोपी करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे.

हेही वाचा-देशव्यापी संपात बँक कर्मचारी संघटनांचा सहभाग; बँकेच्या सेवा विसकळीत

प्राप्तिकर विभागाने हे केले बदल
प्राप्तिकरदात्यांचा त्रास कमी होण्यासाठी फेसलेस असेसमेंट योजना ऑक्टोबरमध्ये लाँच केली आहे. त्यामुळे प्राप्तिकरदाता आणि प्राप्तिकर अधिकाऱ्याची प्रत्यक्ष भेटीची गरज लागणार नाही. प्राप्तिकर विभागाने संगणकीकृत विशिष्ट ओळक क्रमांक असलेली कागदपत्रे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागात पारदर्शकता आणि कर प्रशासनात जबाबदारी वाढणार असल्याचे कर विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा-सुझलॉन एनर्जीने बँकांचे थकविले ७,२०० कोटी रुपये!

खरेदी महोत्सवातून व्यापाऱ्यांना विक्रीचे मोठे माध्यम उपलब्ध होणार-
गतवर्षी सीतारामन यांनी दुबईसारखे खरेदी महोत्सव मार्च २०२० मध्ये देशात सुरू करण्याची घोषणा केली होती. यावर वाणिज्य मंत्रालयाचे काम सुरू आहे. महोत्सवातून व्यापाऱ्यांना वस्तू विक्री करण्यासाठी मोठे माध्यम मिळणार आहे. हे खरेदी महोत्सव देशातील चार शहरांत सुरू करण्यात येणार आहेत. यामधून वस्त्रोद्योग, कातडी उद्योग आणि योगा पर्यटनाला चालना मिळेल, अशी सरकारला अपेक्षा आहे. केंद्र सरकारने रत्नजडित खडे आणि दागिने, वस्त्रोद्योग अशा विविध संकल्पनांवर आधारित खरेदी महोत्सवाचे नियोजन केले आहे.

Intro:Body:

Dummy business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.