डेहराडून - येत्या गुरुवारपासून केदारनाथ यात्रा सुरू होत आहे. यावेळी येणाऱ्या यात्रेकरूंना हेलिकॉप्टर सेवा देण्यासाठी सात विमान कंपन्यांना उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेवून उत्तराखंड सरकारने दोन मार्गावर हेलिकॉप्टरची सेवा देण्यासाठी परवानगी दिली आहे. यामधील एका कंपनीला सिरसी-केदारनाथ मार्गावरील प्रवासाठी चार कंपन्यांना फाटा-केदारनाथ मार्गासाठी तर दोन कंपन्यांना गुप्ताक्षी-केदारनाथ मार्गासाठी परवानगी देण्यात आली आहे.
असा येतो हेलिकॉप्टर प्रवासाला खर्च
फाटा ते केदारनाथ या मार्गावरील हेलिकॉप्टर प्रवासासाठी २०१८ मध्ये ३ हजार ३५० रुपये लागत होते. यात कपात होवून सध्या याच मार्गावर प्रवाशांना २ हजार ३९९ एवढा खर्च येत आहे. सिरसी-केदारनाथ मार्गावरी हेलिकॉप्ट प्रवासाचा खर्च हा ३ हजार १७५ रुपयावरून २ हजार ४७० रुपये झाला आहे. तर गुप्ताक्षी ते केदारनाथ प्रवासासाठी ४ हजा २७५ रुपये खर्च येतो.
हिवाळ्यानंतर बंद असलेले केदारनाथ मंदिर सहा महिन्यानंतर भाविकांसाठी ९ मे नंतर खुले करण्यात आले आहे. हे मंदिर उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील हिमालयांच्या पर्वतरांगामध्ये आहे.