ETV Bharat / business

कोरोनावरील 'सिरम'ची लस मिळणार २२५ रुपयांना, २०२१ पर्यंत येणार बाजारात

सिरमकडून उत्पादन घेण्यात येणारी कोरोनावरील लस 92 देशांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. सिरमचे सीईओ आदार पुनावाला यांनी कोरोनाच्या लसीबाबतची घोषणा ट्विटरवरून केली आहे. लसींच्या उत्पादनासाठी कंपनी गावी आणि बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनची मदत घेतली जाणार आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 7, 2020, 5:15 PM IST

Updated : Aug 7, 2020, 7:17 PM IST

हैदराबाद – पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कोरोनाच्या लसींचे 10 कोटी डोस तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. हे डोस भारत आणि मध्य उत्पन्न असलेल्या देशांसाठी 2021 पर्यंत तयार करण्यात येणार आहे. या लसीची किंमत जास्तीत जास्त 3 डॉलर (सुमारे 225 रुपये) असणार आहे.

सिरमकडून उत्पादन घेण्यात येणारी कोरोनावरील लस 92 देशांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. सिरमचे सीईओ आदार पुनावाला यांनी कोरोनाच्या लसीबाबतची घोषणा ट्विटरवरून केली आहे. लसींच्या उत्पादनासाठी कंपनी गावी आणि बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनची मदत घेतली जाणार आहे. गावी (पूर्वीचे नाव ग्लोबल एअरलाईन्स फॉर व्हॅक्सिन आणि इम्यूनयाझेशन) ही जागतिक आरोग्य क्षेत्रातील सार्वजिनक आणि खासगी अशी भागीदारी असलेली कंपनी आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून गावीला 150 अब्ज डॉलरची मदत केली जाणार आहे. या निधीचा वापर करून सिरमकडून लसीचे उत्पादन घेतले जाणार आहे.

असे असणार लसीच्या वितरणाचे हक्क

अमेरिकेची नोवावॅक्स कंपनीनेही कोरोनाच्या लसीचा पुरवठा करण्यासाठी सिरमबरोबर करार केला आहे. त्याचा वापर व्यावसायिक हेतूसाठी करण्यात येणार आहे. या करारानुसार सिरमला देशामध्ये आणि कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोरोनाच्या लसीचे वितरण करण्याचे विशेष अधिकार असणार आहेत. तर नोवाव्हॅक्स कंपनीकडे उच्च-मध्यम आणि उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लस वितरण करण्याचे अधिकार असणार आहेत.

सिरम ही विविध लसींचे उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीने कोरोनाची लस तयार करणाऱ्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाबरोबर उत्पादनासाठी भागीदारी केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने सिरमला दुसऱ्या व टप्प्यातील कोरोनाच्या लसीची मानवी चाचणी घेण्यासाठी परवानगी दिली आहे. ऑक्सफोर्डच्या कोरोनावरील लसीमुळे प्रतिकारक्षमता वाढत असल्याचे दिसून आले आहे.

Last Updated : Aug 7, 2020, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.