ETV Bharat / business

टाळेबंदीत रद्द झालेल्या विमान तिकीटांचे प्रवाशांना 'असे' परत मिळणार पैसे

author img

By

Published : Oct 1, 2020, 5:58 PM IST

टाळेबंदीत विमान तिकीटे रद्द होऊनही प्रवाशांना पैसे परत मिळू शकले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिल्याने प्रवाशांना पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - टाळेबंदीत विमान तिकीटे रद्द झाल्याने प्रवाशांना पैसे परत मिळणार आहेत. त्याबाबतचा नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) दिलेला प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आहे. जर विमान तिकीट हे एजंटकडून बुक केले असेल तर प्रवाशांना एजंटकडून पैसे मिळणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च ते २४ दरम्यान टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या कालावधीत देशांतर्गत आणि विदेशातील विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्यानंतर प्रवाशांची गैरसोय झाली होती. तिकीट रद्द झाल्यानंतर प्रवासी लिगल सेल, ट्रॅव्हल एजंट यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश अशोक भूषण यांच्यासमोर आज झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत देण्यासाठी डीजीसीएचा प्रस्ताव यावेळी स्वीकारला आहे.

हेही वाचा-वाहन उद्योगाची घसरलेली गाडी रुळावर; सप्टेंबरमध्ये बहुतांश कंपन्यांच्या वाहन विक्रीत वाढ

विमान तिकीटाचे प्रवाशांना असे पैसे शकणार

  • जर २५ मार्च ते २४ मे दरम्यान देशांतर्गत अथवा देशाबाहेर विमान प्रवासासाठी तिकीट बुक केले असेल तर तीन आठवड्यात प्रवाशांना पैसे द्यावे लागणार आहेत.
  • तिकीट रद्द झाल्याचे कोणतेही शुल्क विमान कंपन्यांना आकारता येणार नाहीत.
  • एजंटकडूनही तिकीट बुक करण्यात आले असले तरी प्रवाशांना तातडीने पैसे परत करणे विमान कंपन्यांना बंधनकारक असणार आहे.
  • जर २४ मेनंतर विमान तिकीट रद्द झाल्याचे पैसे ही सिव्हील एव्हिशन रिक्वायरमेंटकडून (सीएआर) परत केले जाणार आहेत.
  • इतर सर्व प्रकरणात रद्द झालेल्या तिकीटांचे पैसे प्रवाशांना १५ दिवसांत द्यावे लागणार आहेत.
  • जर विमान कंपन्यांना आर्थिक समस्या असेल तर प्रवाशांना रद्द झालेल्या तिकीटाच्या रकमेएवढी रक्कम नवीन तिकीट बुकिंगमध्ये प्रवाशांना सवलत द्यावी लागणार आहे. विमान प्रवाशांना ३१ मार्च २०२१ पर्यंत तिकीट खरेदीवर हा फायदा मिळणार आहे.
  • जर हा फायदा ३१ मार्च २०२१ पर्यंत विमान प्रवाशांना घेता आला नाही, तर इतरांना हा फायदा हस्तांतरित करता येणार आहे. अशा तिकीटाच्या रकमेवर विमान कंपन्यांना ३० जून २०२०पर्यंत मासिक ०.५ टक्के व्याज लागू लागणार आहे. त्यानंतर हे व्याज वाढून ३१ मार्चनंतर २०२१ पर्यंत ०.७५ टक्के व्याज लागू होणार आहे.

हेही वाचा-...म्हणून मल्टीप्लेक्स ऑपरेटरच्या शेअर्समध्ये १८ टक्क्यापर्यंत तेजी!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.