ETV Bharat / business

येस बँकेचे ७,२५० कोटींचे शेअर खरेदीला एसबीआय संचालक मंडळाची संमती - Yes bank Crisis

एसबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या कार्यकारी समितीची बैठक ११ मार्चला २०२० ला झाली. यामध्ये येस बँकेचे शेअर खरेदी करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. या शेअर खरेदीनंतर स्टेट बँकेचा येस बँकेमध्ये ४९ टक्क्यापर्यंत हिस्सा राहणार आहे.

येस बँकेचे संचालक
येस बँकेचे संचालक
author img

By

Published : Mar 12, 2020, 7:45 PM IST

नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक मंडळाने (ईसीसीबी) येस बँकेचे ७२५ कोटी शेअर खरेदी करण्याला मंजुरी दिली आहे. येस बँकेच्या प्रति शेअरची किंमत १० रुपये आहे. त्यामुळे स्टेट बँकेला ७,२५० कोटी रुपये येस बँकेला द्यावे लागणार आहेत.

एसबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या कार्यकारी समितीची बैठक ११ मार्चला २०२० ला झाली. यामध्ये येस बँकेचे शेअर खरेदी करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. या शेअर खरेदीनंतर स्टेट बँकेचा येस बँकेमध्ये ४९ टक्क्यापर्यंत हिस्सा राहणार आहे.

हेही वाचा-किरकोळ बाजारातील महागाईत घसरण; फेब्रुवारीत ६.५८ टक्क्यांची नोंद

भारतीय रिझर्व्ह बँकेने तयार केलेल्या फेरआराखड्याप्रमाणे स्टेट बँक येस बँकेचा ४९ टक्क्यापर्यंत हिस्सा घेवू शकते. गेल्या आठवड्यात आरबीआयने येस बँकेवर निर्बंध लागू केल्याने खातेदारांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये खात्यामधून काढता येतात. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेला वाचविण्यासाठी स्टेट बँकेने पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा-बँक घोटाळा - माजी संचालकांसह २ व्हॅल्युअरला मुंबई पोलिसांकडून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.