नवी दिल्ली - सॅमसंग पुढील वर्षी आपला नवी स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. गॅलेक्सी सिरीजमधील ओ ७२ हा स्मार्टफोन ग्राहकांना विविध फिचर्ससह मिळणार आहे.
रॅम 8 जीबी
8 जीबी रॅमसह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720जी प्रोसेसर यात देण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. तर याचे एसएम-ए 725 एफ आणि एसएम-ए 726 बी मोड्स अनुक्रमे 4जी आणि 5जी आवृत्तीसह बाजारात आणले जातील, असे जीएसएम अरिनाने म्हटले आहे.
अँड्रॉइड 11वरदेखील करणार बूट
परफॉर्मन्स युनिटसह गॅलेक्सी ए ७२ गीकबेंच ५एसच्या सिंगल कोअर आणि मल्टी कोअर टेस्टमध्ये ५४९ आणि १६३७ स्कोअर करण्यात यशस्वी झाला आहे. हा डिव्हाइस वन यूजर इंटरफेस (यूआय) आधारित अँड्रॉइड 11वरदेखील बूट करेल.
प्लास्टिक बॅक पॅनेल
गॅलेक्सी ए ७२ अॅक्ल्यूमिनिअम फ्रेमसह प्लास्टिक बॅक पॅनेलसह आणला जाईल. यात ६.७ इंच डिस्प्ले, ३.५ मी. मी. हेडफोन जॅक, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि खाली स्पीकर ग्रीलसह उपलब्ध होणार आहे. यात १२ एमपी अल्ट्रा वाइड कॅमेरा, एक ५ एमपी मॅक्रो कॅमेरा, एक डेप्थ कॅमेरा तर ६४ एमपीचा एक मेन कॅमेरा असेल.
नवा कॅमेरा सेन्सर
एका नव्या कॅमेरा सेन्सरचा उपयोग करून परफॉर्मन्स सुधारण्यावर सॅमसंगने भर दिला आहे. यासाठी पोस्ट प्रोसेसिंग अल्गोरिदममध्ये सुधारणा करू शकते.