ETV Bharat / business

वस्तू व सेवांच्या आर्थिक व्यवहाराकरता स्वतंत्र प्रिपेड कार्ड - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया - प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट

नव्या प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट कार्डमुळे आणखी सुविधा मिळणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. या प्रिपेड कार्डवर केवळ बँक खात्यामधून रक्कम भरणे शक्य होणार आहे. त्याचा विविध बिल आणि वस्तू खरेदीसाठी वापर करणे शक्य होणार आहे.

Reserve Bank of India
संग्रहित - भारतीय रिझर्व्ह बँक
author img

By

Published : Dec 5, 2019, 4:40 PM IST

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने नवे प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट (पीपीआयएस) आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या कार्डद्वारे ग्राहकांना वस्तू आणि सेवांचे १० हजार रुपयापर्यंतचे आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहे. याबाबतची आरबीआयने पतधोरण जाहीर करताना घोषणा केली.

प्रिपेड कार्ड हे डिजिटल आर्थिक व्यवहाराला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. नव्या प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट कार्डमुळे आणखी सुविधा मिळणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. या प्रिपेड कार्डवर केवळ बँक खात्यामधून रक्कम भरणे शक्य होणार आहे. त्याचा विविध बिल आणि वस्तू खरेदीसाठी वापर करणे शक्य होणार आहे. याशिवाय वित्तीय सेवांसाठीही प्रिपेड कार्डचा वापर करता येणार आहे. प्रिपेड कार्डबाबत ३१ डिसेंबर २०१९ ला अधिक सूचना काढण्यात येतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

हेही वाचा-मी फारसा कांदा खात नाही; निर्मला सीतारामन यांचे लोकसभेत वक्तव्य

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांच्या बँकिंग युनिटला (आयबीयूएस) विदेशी चलन चालू खाते काढण्यालाही आरबीआयने परवानगी दिली आहे. या खात्यांमुळे कॉर्पोरेट कंपन्यांना कर्ज देणे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांना सुलभ होणार आहे. तसेच त्यांना विदेशी चलनात मुदत ठेवी स्वीकारण्यासही आरबीआयने मान्यता दिली आहे. मात्र, त्यासाठी जास्तीत जास्त एक वर्षाच्या मुदत ठेवीच आयबीयूएसमध्ये स्वीकारता येणार आहेत.

Intro:Body:

PPIs have been playing an important role in promoting digital payments and bringing in the new PPI will further facilitate its usage,  as per an RBI statement issued post announcement of the monetary review on Thursday.

Mumbai: The Reserve Bank on Thursday proposed to introduce a prepaid payment instrument (PPI) that could be used only for transactions of goods and services worth up to Rs 10,000.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.