मुंबई – कोरोना महामारीत भारतीय रिझर्व्ह बँकेने सोने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्यांना दिलासा दिला आहे. ग्राहकांनी सोने गहाण ठेवल्यास त्यांना कर्जाची रक्कम 75 टक्क्यांवरून 90 टक्के देण्यास आरबीआयने बँकांना परवानगी दिली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर जाहीर केले. यावेळी शक्तिकांत दास म्हणाले, की कोरोनाचा परिणाम कुटुंब, आंत्रेप्रेन्युअर आणि लघू उद्योगांवरील कमी होण्यासाठी सोन्यावरील कर्जाच्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. हे कर्ज बिगर कृषी कारणांसाठी असेल, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
सोन्यावरील कर्जाच्या मर्यादेत 31 मार्च 2021पर्यंत वाढ राहणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. यापूर्वी बँकांकडून सोन्याच्या मूल्यावर जास्तीत जास्त 75 टक्के कर्ज देण्याचे आरबीआयने निर्देश दिले होते.