नवी दिल्ली - उद्योगपती रतन टाटा यांनी प्रितीश नंदी कम्युनिकेशन्समध्ये गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीनंतर कंपनीचे शेअर वधारले आहेत.
टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टचे मानद चेअरमन रतन टाटा यांनी प्रितीश नंदी कम्युनिकेशन्समध्ये वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात कम्युनिकेशन्समध्ये शेअर खरेदी केल्याचे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
हेही वाचा-बँक कर्मचारी संघटनांच्या संपांनी देशामध्ये बँकांचे कामकाज विस्कळित
टाटा यांच्याकडून विविध स्टार्ट अप आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येते. टाटा यांनी गुंतवणूक केल्यानंतर कंपनीत प्रितीश नंदी कम्युनिकेशन्सचे शेअर ९.८१ टक्क्यांनी वाढून प्रति शेअर २३.५० रुपये आहेत.
हेही वाचा-घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण फेब्रुवारीमध्ये वाढून ४.१७ टक्के
नुकतेच रतन टाटांनी घेतली आहे लस-
नुकतेच उद्योगपती रतन टाटा यांनी समाज माध्यमात लसीकरण मोहिमेचे कौतुक केले आहे. त्यांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण देशात वाढत असताना रतन टाटा यांनी लस घेतली आहे. टाटा म्हणाले, मला खरोखर आशा आहे. प्रत्येकाची लस मिळेल. त्यांचे संरक्षण होईल.