जयपूर - कोरोनाच्या संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी जयपूरमधील कंपनीने खास रोबो तयार केले आहेत. हे रोबो थर्मल स्क्रिनिंग करू शकतात. तसेच जे लोक मास्क घालत नाहीत, त्यांना रोबो ओळखू शकतात.
आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत करण्यासाठी तयार केलेले रोबो हे ९५ टक्के देशात तयार केले आहेत. स्पाईन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला हा देशातील पहिला रोबो असल्याचे क्लब फर्स्टचे व्यवस्थापकीय संचालक भुवनेश मिश्रा यांनी सांगितले.
हेही वाचा-'केवळ कागदावर घोषणा करून शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही'
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राजस्थानात ४ हजार ५३४ कोरोनाचे रुग्ण आहेत.
हेही वाचा-आंध्रप्रदेश सरकारचा ६ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'नारळ'