नवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सरकारने अनेक रेल्वे सेवा रद्द केल्या आहेत. तसेच अनेक प्रवाशांनी आरक्षण रद्द केले आहे. अशा प्रवाशांनी तिकीट आरक्षण केंद्रावर येवू नये, असे रेल्वेने आवाहन केले आहे. प्रवाशांना 30 ते 45 दिवसांपर्यत तिकिटाचे रिफंड मागण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे.
तिकिटाचे पैसे परत घेण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर गर्दी करू नये, असे रेल्वेने आवाहन केले आहे. ई-तिकिटाचे आरक्षण रद्द करण्याचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. जे प्रवासी २१ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत रेल्वेने जाणार होते, त्यांच्यासाठी रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवास करण्याच्या दिवसापासून ४५ दिवसापर्यंत कधीही तुम्ही परत पैसे परत मागू शकता. यापूर्वी प्रवास करण्याच्या दिवसापासून तीन तास अथवा ७२ तासापर्यंत प्रवाशांना पैसे परत मागता येऊ शकत होते.
हेही वाचा-कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करा, सरकारच्या उद्योगांना सूचना
जर रेल्वे रद्द झाली नाही तर, प्रवासाच्या दिनांकापासून ३० दिवसापर्यंत तिकीट डिपॉझिट रिसिप्ट देता येणार आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या जनता कर्फ्युचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे.
हेही वाचा-दिलासादायक! कंपन्यांनी साबणांच्या किमती कमी करून वाढविले उत्पादन