ETV Bharat / business

कोरोनाचा असाही परिणाम; आता मद्य कंपनी करणार सॅनिटायझरची निर्मिती

रॅडिको खेतानकडून रामपूरमधील डिसटिलरीच्या कारखान्यात सॅनिटायझरचे उत्पादन घेतले जाणार आहे. उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांसाठी अर्ज करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. लवकरच बाजारात सॅनिटायझर उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

सॅनिटायझर
सॅनिटायझर
author img

By

Published : Mar 24, 2020, 2:17 PM IST

Updated : Mar 24, 2020, 3:06 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता सॅनिटायझरची बाजारात प्रचंड मागणी वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मद्यनिर्मिती करणाऱ्या रॅडिको खेतान कंपनीने सॅनिटायझरचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रॅडिको खेतानकडून रामपूरमधील डिसटिलरीच्या कारखान्यात सॅनिटायझरचे उत्पादन घेतले जाणार आहे. उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांसाठी अर्ज करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. लवकरच बाजारात सॅनिटायझर उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-कोरानाचा प्रसार वाढल्याने इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी ३१ मार्चपर्यंत थांबविले उत्पादन

देशामध्ये सर्वाधिक स्पिरिटचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीपैकी रॅडिको खेतान कंपनी आहे. कोरोनाच्या संकटकाळात देशाला मदत करण्यासाठी आम्ही सॅनिटायझरचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतल्याचे रॅडिको खेतानचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अमर सिन्हा यांनी सांगितले.

हेही वाचा-शेअर बाजार सावरण्यास सुरुवात; १,२०० अंशांनी वधारला निर्देशांक

सध्या, बाजारात हॅण्ड सॅनिटायझरचा तुटवडा आहे. त्यामुळे रॅडिको खेतानचा निर्णय दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे.

Last Updated : Mar 24, 2020, 3:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.