नवी दिल्ली - जीएसटी कपातीबाबतचा विषय केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान यांच्यापर्यंत पोहोचवू, असे केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वाहन उद्योगाला आश्वासन दिले आहे. ते वाहन उद्योगांची संघटना एसआयएएमच्या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्च्युअर्सने (एसआयएएम) वार्षिक ऑनलाईन कार्यक्रमात प्रकाश जावडेकर यांनी जीएसटीच्या मुद्द्यावर मत व्यक्त केले. ते म्हणाले, की वाहन उद्योगाला मागणी वाढण्यासाठी विशेष सणात मागणी वाढण्यासाठी काही सवलत मिळणार आहे. पुढे जावडेकर म्हणाले, की जीएसटी कपातीबाबतचा निर्णय घेण्यासाठी जीएसटी परिषद आणि सामाजिक-आर्थिक परिणाम काय होतो, याचा विचार करावा लागतो.
हेही वाचा-कर्जाची पुनर्रचना योजना १५ सप्टेंबरपर्यंत सुरू करा; केंद्रीय अर्थमंत्र्यांची बँकांना सूचना
केंद्र सरकारला राज्यांना जीएसटी मोबदला देणे शक्य नसल्याचा प्रश्न निर्माण झाला. त्याबाबत बोलता केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले, की आधीच महसुलाचे प्रमाण खूप कमी आहे. जीएसटी दराच्या कपातीसारख्या निर्णयावरही विचार करावा लागतो. मला अपेक्षा आहे, तुम्हाल काही तरी नक्कीच चांगली बातमी मिळणार आहे. कोरोना महामारीचा वाहन उद्योगाच्या मागणीवर मोठा परिणाम झाला आहे. तर गतवर्षीही वाहन उद्योगाला मंदीसदृश्य स्थितीला सामोरे जावे लागले आहे. वाहनांची मागणी वाढविण्यासाठी करात कपात करावी, अशी वाहन उद्योजकांची मागणी आहे.
हेही वाचा-ग्रामीण भागात रोजगार मिळेना; देशातील बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ
नुकतेच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दुचाकीवरील जीएसटीच्या कपातीच्या प्रस्तावावर जीएसटी परिषद विचार करणार असल्याचे सांगितले.