नवी दिल्ली - पंतप्रधान हे मोरांबरोबर व्यस्त आहेत. त्यामुळे लोकांनी स्वत:चे जीवन वाचविण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचा लोकांना सल्ला दिल्याची उपरोधिक टीका राहुल गांधींनी केली. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राहुल गांधींनी मोदी सरकारवर आज निशाणा साधला आहे.
चालू आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० लाखांहून अधिक होईल, असा राहुल गांधींनी ट्विट करून अंदाज केला. तर सक्रिय असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० लाखांहून अधिक होईल, असेही गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
कोरोना संक्रमण के आँकड़े इस हफ़्ते 50 लाख और ऐक्टिव केस 10 लाख पार हो जाएँगे।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
अनियोजित लॉकडाउन एक व्यक्ति के अहंकार की देन है जिससे कोरोना देशभर में फैल गया।
मोदी सरकार ने कहा आत्मनिर्भर बनिए यानि अपनी जान ख़ुद ही बचा लीजिए क्योंकि PM मोर के साथ व्यस्त हैं।
">कोरोना संक्रमण के आँकड़े इस हफ़्ते 50 लाख और ऐक्टिव केस 10 लाख पार हो जाएँगे।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 14, 2020
अनियोजित लॉकडाउन एक व्यक्ति के अहंकार की देन है जिससे कोरोना देशभर में फैल गया।
मोदी सरकार ने कहा आत्मनिर्भर बनिए यानि अपनी जान ख़ुद ही बचा लीजिए क्योंकि PM मोर के साथ व्यस्त हैं।कोरोना संक्रमण के आँकड़े इस हफ़्ते 50 लाख और ऐक्टिव केस 10 लाख पार हो जाएँगे।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 14, 2020
अनियोजित लॉकडाउन एक व्यक्ति के अहंकार की देन है जिससे कोरोना देशभर में फैल गया।
मोदी सरकार ने कहा आत्मनिर्भर बनिए यानि अपनी जान ख़ुद ही बचा लीजिए क्योंकि PM मोर के साथ व्यस्त हैं।
राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले, नियोजन नसलेली टाळेबंदी हे एका व्यक्तीच्या अहंकाराचे प्रतिक आहे. त्यामुळे देशभरात कोरोनाचा संसर्ग पसरत गेला आहे. मोदी सरकारने आत्मनिर्भर होण्यास सांगितले आहे. त्याचा अर्थ तुमचे आयुष्य तुम्हीच वाचवायचे आहे. कारण पंतप्रधान हे मोरांसोबत व्यस्त आहेत.
हेही वाचा-टिकटॉकच्या खरेदीचा फिस्कटला सौदा; मायक्रोसॉफ्ट नव्हे 'ही' कंपनी आहे शर्यतीत
नुकतेच पंतप्रधान मोदी हे मोरांना अन्न खाऊ घालत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात पोस्ट केला होता. कोरोना महामारीचे संकट हाताळण्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहे. यापूर्वीही त्यांनी केलेले आरोप केंद्र सरकारने फेटाळले होते.
हेही वाचा- जीएसटी मोबदला : कर्जे घेण्यासाठी भाजपाची सत्ता असलेली १३ राज्ये अनुकूल
देशभरातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या आज ४८ लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या २४ तासात नव्याने ९२ हजार ७१ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. तर मृतांची एकूण संख्या ही ७९ हजार ७२२ झाली आहे. तर २४ तासात १ हजार १३६ जणांचा मृत्यू झाला आहे.