ETV Bharat / business

केंद्रीय वाणिज्य मंत्रीपदी पियूष गोयलांची वर्णी, 'ही' आहेत आव्हाने

author img

By

Published : May 31, 2019, 6:06 PM IST

नवे औद्योगिक धोरण, राष्ट्रीय-ई कॉमर्स धोरण, राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण आणि विदेशी व्यापार धोरण ही विविध धोरणे आखण्याची जबाबदारी पियूष गोयल यांना पेलवावी लागणार आहे.

मावळते केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत पियूष गोयल

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात अनेपेक्षितपणे माजी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी माजी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची वर्णी लागली आहे. गोयल यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा आज पदभार घेतला आहे. यावेळेस त्यांच्यासोबत सुरेश प्रभू हेदेखील होते. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध पेटल्याने जागतिक आर्थिक मंचावर तणावाची स्थिती आहे. अशा स्थितीत पियूष गोयल यांच्यासमोर विविध आव्हाने आहेत.

नवनिर्वाचित केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. त्यांनी विश्वास ठेवून मला वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची संधी दिली आहे. गोयल हे माजी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमेवत मंत्रालयात आले होते. पुढे ते म्हणाले, की मला वरिष्ठ सहकारी प्रभू यांच्याकडून खूप काही शिकावे लागणार आहे. त्यांच्याकडून मी मागर्दर्शन आणि सहकार्य घेत राहणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. यावेळी सुरेश प्रभू यांनी गोयल यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला.

ही आहेत नव्या केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांसमोर आव्हाने -

अमेरिका-चीन व्यापारी युद्धानंतर इतर देशही त्यांच्या उत्पादनांसाठी बचावात्मक उपाययोजना करत आहेत. अशा परिस्थितीत गोयल यांच्यापुढे देशातील उत्पादनांची निर्यात वाढविण्याचे आव्हान आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये देशाचा व्यापार ९ टक्क्याने वाढून ३३१ बिलियन डॉलरवर पोहोचला आहे. असे असले तरी याच वर्षात थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण गेल्या सहा वर्षात सर्वात कमी आहे.

नव्या धोरणाची परिपूर्ण आखणी करण्याची जबाबदारी-

नवे औद्योगिक धोरण, राष्ट्रीय-ई कॉमर्स धोरण, राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण आणि विदेशी व्यापार धोरण ही विविध धोरणे आखण्याची जबाबदारी पियूष गोयल यांना पेलवावी लागणार आहे. मुक्त व्यापारासाठी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी करार (आरसीईपी) करताना त्यासाठी भारताचे हितसरंक्षण करणे, उद्योगानुकलतेचे मानांकन वाढविणे आणि विशेष आर्थिक क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पावले उचलणे ही आव्हाने गोयल यांच्यासमोर आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.