नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढ सुरुच आहे. त्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा इंधनाचे दर वाढविले आहेत. या दरवाढीने पेट्रोलचे दर बुधवारी प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक झाले आहेत.
इंडियन ऑईल, एचपीसीएल आणि बीपीसीएल या ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोलचे दर प्रति लिटर ३५ पैशांनी वाढविले आहेत. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर १००.२१ रुपये आहे. डिझेलचा दर प्रति लिटर ८९.५३ रुपये आहे. मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि पुण्यात यापूर्वीच पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक झाले आहेत. कोलकात्यामध्ये पहिल्यांदाच पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहेत.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : 43 नेते आज पदाची शपथ घेणार असल्याची शक्यता
पेट्रोल आणि डिझेलवरील कराचे दर राज्यात वेगवेगळे -
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर सर्व दर जोडल्याने इंधनाची किंमती जवळजवळ दुप्पट होते. देशाला ८९ टक्के कच्चे तेल आयात केले जाते. म्हणूनच जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीमध्ये चढ-उतार होतो. तेव्हा भारतातील तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होते. तेलाच्या किंमती वाढण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती आणि केंद्र व राज्ये यांच्याकडून उच्च कर दरात वाढ. पेट्रोल आणि डिझेलवरील कराचे दर राज्यात वेगवेगळे असतात.
हेही वाचा-LIVE UPDATES : Modi Cabinet Expansion : रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांचा राजीनामा?
या कारणाने इंधनाच्या दरात वाढ-
सरकारी तेल कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती व विदेशी विनियमाचा आढावा घेतला जातो. त्यानुसार इंधनाचे दर सरकारी कंपन्यांकडून बदलण्यात येतात. भारतासह विविध देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने कच्च्या तेलाची मागणी वाढत आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया बळकट होत असल्याने आयातीसाठी लागणाऱ्या कच्च्या तेलासाठी सरकारला जादा पैसे मोजावे लागत आहेत.