ETV Bharat / business

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

author img

By

Published : May 18, 2021, 3:23 PM IST

पेट्रोलचे दर मे महिन्यात एकूण दहा वेळा वाढवून प्रति लिटर २.३० रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर मे महिन्यात प्रति लिटर २.७८ रुपयांनी वाढले आहेत.

पेट्रोल-डिझेल दर
पेट्रोल-डिझेल दर

नवी दिल्ली - एक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोलच्या किमती दिल्लीत प्रति लिटर २७ पैशांनी वाढून ९२.८५ रुपये आहेत. तर डिझेलची किंमत प्रति लिटर २९ पैशांनी वाढून ८३.५१ रुपये आहे.

गेल्या काही दिवसांपासून सरकारी कंपन्यांकडून इंधनाचे दर रोज बदलण्याऐवजी एक दिवसाआड बदलण्यात येत आहे. पेट्रोल व डिझेलचे दर मंगळवारी प्रति लिटर २५ ते ३० पैशांनी वाढले होते. रविवारी पेट्रोलचे दर प्रति लिटर २४ पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर २७ पैशांनी वाढले होते. तर शनिवारी पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर राहिले होते. तर त्यापूर्वी शुक्रवारी पेट्रोल व डिझेलचे दर वाढले होते.

हेही वाचा-कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास 'ही' कंपनी कुटुंबाला १ कोटीपर्यंत करणार मदत

एकाच महिन्यात दहा वेळा इंधन दरात वाढ-

पेट्रोलचे दर मे महिन्यात एकूण दहा वेळा वाढवून प्रति लिटर २.३० रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर मे महिन्यात प्रति लिटर २.७८ रुपयांनी वाढले आहेत.

हेही वाचा-भारताला धक्का; ओएनजीने शोधलेल्या इराणमधील गॅस साठ्याचे गमाविले कंत्राट

निवडणूक काळात सरकारी तेल कंपन्यांना प्रति लिटर २ ते ३ रुपये नुकसान

पाच राज्यांसह केंद्रशासित प्रदेशाची विधानसभा निवडणूक पार पडतात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर वाढविण्या सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या काळात जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढूनही सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर स्थिर ठेवले होते. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना प्रति लिटर २ ते ३ रुपये नुकसान सोसावे लागले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.