बंगळुरू - डिजीटल देयक व्यवहारामध्ये जगभरात आघाडीवर असलेली पेपल कंपनीने भारतामध्ये १ हजार अभियंते नियुक्त करणार असल्याचे जाहीर केले आहे. हे अभियंते बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमधील कंपनीच्या सेंटरमध्ये काम करणार आहेत.
पेपल कंपनीने देशामधून डिजीटल देयक सेवा १ एप्रिलपासून गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी कंपनीने भारतीय उद्योगांसाठी आंतरराष्ट्रीय विक्रीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकणार आहेत.
हेही वाचा-स्पेक्ट्रम खरेदीत जिओची बाजी; केंद्र सरकारला मिळाले तब्बल ७७,८१५ कोटी रुपये!
सॉफ्टवेअर, उत्पादन विकास, डाटा सायन्स, रिस्क अॅनालिटिक्स, बिझनेस अॅनालिटिक्स स्ट्रिम्समध्ये अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे कर्मचारी मध्यम आणि वरिष्ठ पातळीवर काम करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पेपल इंडियाने देशातील आघाडीच्या अभियांत्रिका महाविद्यालयांमध्ये कॅम्पस मुलाखती घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा-इफ्फकोकडून बिगर युरिया खतांच्या किमती राहणार 'जैसे थे'
भारतामधील डिजीटल तंत्रज्ञान केंद्रांची महत्त्वाची भूमिका-
भारतामधील डिजीटल तंत्रज्ञान केंद्र हे अमेरिकेबाहेरील सर्वात मोठी केंद्र आहेत. या केंद्रांमधून सातत्याने संशोधनासाठी महत्त्वाची भूमिका पार पडण्यात आल्याचे पेपल इंडियाचे उपाध्यक्ष गुरु भट यांनी सांगितले. डिजीटल देयक व्यवहार ही अत्यावश्यक सेवा होत चालली आहे. आम्ही जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासाठी बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहोत. त्यामधून ग्राहक आणि व्यापाऱ्यांना गरजेप्रमाणे उत्पादने आणि सेवा मिळू शकणार असल्याचे भट यांनी सांगितले.