नवी दिल्ली - आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये भविष्य निर्वाह निधी खात्यावर (ईपीएफओ) ८.६५ टक्के व्याज मिळणार असल्याचे केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले. हा लाभ ६ कोटी ईपीएफओ खातेदांराना मिळणार असल्याची त्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेची (ईपीएफओ) निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेने गेल्या आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याजदर देण्याचा निर्णय फेब्रुवारी मंजूर केला आहे. यावर पुढील निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव वित्तीय मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. सणाच्या तोंडावर ईपीएफओ खातेदारांना ८.६५ टक्के व्याजदर मिळणार असल्याचे गंगवार यांनी सांगितले. गंगवार हे ईपीएफओच्या केंद्रीय मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
गेल्या ३ वर्षात सर्वात अधिक ईपीएफवर व्याजदर-
गेल्या ३ वर्षात सर्वात अधिक ईपीएफवर व्याजदर मिळणार आहे. यापूर्वी २०१७-२०१८ मध्ये ईपीएफओचा व्याजदर हा ८.५५ टक्के होता.