ETV Bharat / business

देशव्यापी संप: दुसऱ्या दिवशी विदेशी बँकांमधील कर्मचाऱ्यांचाही सहभाग - two day bank strike

खासगीकरणाला विरोध करत बँक कर्मचारी संघटनांनी १५ मार्चपासून दोन दिवसीय संप सुरू केला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी जुन्या खासगी बँकांमधील कर्मचाऱ्यांनी आज कामकाज केले नाही. एकंदरीत बँकांमधून रोख रक्कम काढणे, धनादेश वटविणे आणि इतर व्यवहारांवर संपामुळे परिणाम झाला आहे.

Bank employees strike
बँक कर्मचारी संप
author img

By

Published : Mar 16, 2021, 3:59 PM IST

नवी दिल्ली - बँक कर्मचारी संघटनांनी संप पुकारलेल्या शेवटच्या दिवशी देशातील सरकारी बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. या संपात सार्वजनिक बँकांमधील सुमारे १० लाख कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे आज विदेशी बँकांमधील कर्मचाऱ्यांनीही संपात सहभाग घेतला आहे.

खासगीकरणाला विरोध करत बँक कर्मचारी संघटनांनी १५ मार्चपासून दोन दिवसीय संप सुरू केला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी जुन्या खासगी बँकांमधील कर्मचाऱ्यांनी आज कामकाज केले नाही. एकंदरीत बँकांमधून रोख रक्कम काढणे, धनादेश वटविणे आणि इतर व्यवहारांवर संपामुळे परिणाम झाला आहे.

हेही वाचा-२ हजार रुपयांच्या नोटांची दोन वर्षे छपाई नाही- अनुरागसिंह ठाकूर

हा संप युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (युएफबीयु) पुकारला आहे. ही संघटना नऊ बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनेची शिखर संघटना आहे. या संघटनांनी सरकारी बँकांच्या खासगीकरणाला विरोध करत संप पुकारला आहे. गेल्या महिन्यात अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला बँक कर्मचारी संघटनांचा विरोध आहे.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करण्यावर विचार करण्यास केंद्र सरकार तयार

१६,५०० कोटी रुपयांच्या व्यवहारात अडथळा-

बँक कर्मचारी संघटनांच्या दाव्यानुसार संपामुळे एकूण १६,५०० कोटी रुपयांच्या रकमेचे २ कोटी धनादेश वटले नाहीत. सर्व सार्वजनिक बँका या लोकांनी कष्ट करून कमविलेल्या लोकांचे प्रतिनिधीत्व करतात. सरकारी बँकांचे खासगीकरण केल्याने त्यांची बचत धोक्यात येऊ शकते. यापूर्वी अनेक खासगी बँका तोट्यात गेल्याने लोकांचे पैसे बुडाल्याचे एआबीईएने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.