सेऊल - सॅमसंगने मिनी एलईडी टीव्हीचे दोन मॉडेल लाँच करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये वेगवान आणि स्थिर असलेले वायफाय तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
सॅमसंगने निओ क्यूएलईडी टीव्हीचे QN900A आणि QN800A हे दोन मॉडेल लाँच केले आहे. सहाव्या पिढीतील वायफाय कनेक्टिव्हिटी असलेले हा जगातील पहिला टीव्ही असल्याचा कंपनीचा दावा आहे. या मॉडेलला वायफा अलायन्सने प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे.
हेही वाचा-पेट्रोलचे दर प्रति लिटर 22 पैसे तर डिझेलचे दर 22 पैशांनी स्वस्त
दक्षिण कोरियाची टेक तंत्रज्ञान कंपनीच्या नव्या मॉडेलमध्ये वायफाय-6 तंत्रज्ञानामधून चारपटीने वेगान कनेक्टिव्हिटी मिळते. तर वायफाय 5 मधून विविध डिव्हाईसमधून डाटा ट्रान्सफर करणे शक्य आहे. प्रमाणीकरण असलेले नवीन वायफाय 6 ई तंत्रज्ञानाची रचना ही 6GHz फिक्वन्सीच्या वापरासाठी उपयुक्त आहे. त्यामध्ये 2.4GHz आणि 5GHz फिक्वन्सीचाही समावेश आहे. सॅमसंग निओ क्यूएलईडी 8 के टीव्हीमधून मोठ्या बँडविथ, मल्टी गिगाबीट डाटा आणि सुरक्षित कनेक्टिव्हिटी मिळते.
हेही वाचा-मुंबईत रिअल इस्टेटला 'अच्छे दिन'; मार्चमध्ये घरांच्या विक्रीत तिप्पटीने वाढ
निओ क्यूएलईडी टीव्हीमधील वायफाय 6E तंत्रज्ञानामुळे विक्रीत वाढ होईल, असा सॅमसंगने विश्वास व्यक्त केला आहे. विशेषत: ओटीटीचा वापर, व्हर्च्युअल रिअॅल्टी आणि गेमिंग सेवेचा वापर करणाऱ्या ग्राहकांकडून या तंत्रज्ञानाची मागणी वाढेल, असे कंपनीने म्हटले आहे.