चेन्नई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १० सरकारी बँकांच्या विलिनीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर बँक कर्मचारी संघटनेने आंदोलन केले होते. यावर बोलताना सीतारामन म्हणाल्या, प्रत्येक कर्मचारी संघटनेला सांगू इच्छित आहे. बँकांच्या विलिनीकरणानंतर एकाही बँक कर्मचाऱ्याला काढून टाकण्यात येणार नाही.
सीतारामन यांनी शुक्रवारी १० सरकारी बँकांचे ४ बँकात विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला. संख्येने कमी पण मजबूत बँकांची उभारणी करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तसेच सरकारी बँकांना ७० हजार कोटींचे भांडवली अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा-भाजप सरकार देशाला दिवाळखोरीकडे ढकलतयं, देशात आर्थिक आणीबाणी - काँग्रेस
सरकारी बँकांच्या विलिनीकरणानंतर नोकऱ्या जाणार असल्याची भीती ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशनने व्यक्त केली आहे. बँकांचे विलिनीकरण म्हणजे सहा बँका बंद पडण्यासारखे असल्याचा संघटनेने दावा केला.
हेही वाचा -सरकारी बँकांच्या विलिनीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांची निदर्शने
हेही वाचा-सरकारी बँकांमधील प्रशासकीय सुधारणांची निर्मला सीतारामन यांच्याकडून घोषणा