मुंबई - अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता बँका उत्प्रेरक ठरणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. बँकांनी अधिक कार्यक्षमता आणि विकासासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बँकांना सल्ला दिला. त्या पीएसबीच्या बँकिंग सेवांच्या उद्घटनाप्रसंगी बोलत होते.
प्रधानमंत्री जन धन योजनेत योगदान देणाऱ्या बँकांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कौतुक केले. अद्यापही बँकिंग सेवा काही क्षेत्रात पोहोचल्या नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, की उद्योगांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी उत्प्रेरक क्रियाशील भूमिका पार पाडणार आहेत. अनेक उद्योग हे सामान्यस्थितीत येण्यासाठी संघर्ष करत आहेत. बँकांच्या सहज मिळणाऱ्या सुविधा आणि कार्यक्षमतेमुळे उद्योगांना चालना मिळू शकेल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. टाळेबंदीत चांगली सेवा दिल्याबद्दलही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बँकांचे यापूर्वीही कौतुक केले होते.