ETV Bharat / business

जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर.. मोबाईलच्या किमती वाढणार

author img

By

Published : Mar 14, 2020, 7:08 PM IST

काडीपेटीतील हाताने तयार केलेल्या आगकाडीवर एकाच पद्धतीने १२ टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तर विमान देखभाल व दुरुस्तीच्या सेवेवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.

Nirmala Sitaraman
निर्मला सीतारामन

नवी दिल्ली - दैनंदिन जीवनातील वापरात येणाऱ्या मोबाईलच्या किमती आजपासून वाढणार आहेत. वस्तू व सेवा (जीएसटी) परिषदेने मोबाईल आणि काही विशिष्ट सुट्ट्या भागांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय झाला.

मोबाईल आणि काही विशिष्ट सुट्ट्या भागांवरील वाढलेल्या जीएसटीचा निर्णय आजपासून लागू होणार आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकेणी यांनी जीएसटीमध्ये चांगल्या सुविधा, करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा प्रस्तावित केली आहे. ही यंत्रणा जुलै २०२१ ऐवजी जूलै २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे.

हेही वाचा-'देशातील विमान वाहतुकीत १५ ते २० टक्के घसरण होईल'

हाताने तयार केलेल्या काडीपेटीतील काड्या आणि मशिनवर तयार केलेल्या काड्या यावर समान १२ टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नीर्मला सीतारामन यांनी सांगितले. तर विमान देखभाल व दुरुस्तीच्या सेवेवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी वार्षिक परतावा भरण्याची अंतिम मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याची माहितीही सीतारामन यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.