ETV Bharat / business

घरगुती गॅस सिलिंडरचे मिस कॉलवर बुकिंग सुरू

इंडियन ऑईल एलपीजीच्या ग्राहकांना 8454955555 या नंबरवर मिस कॉल केल्यावर सिलिंडरची बुकिंग होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यासाठी कॉलिंग दर वगळता कोणतेही शुल्क लागू होणार नाही.

author img

By

Published : Jan 1, 2021, 7:41 PM IST

धर्मेंद्र प्रधान
धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली - घरगुती गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी होणाऱ्या त्रासातून ग्राहकांची सुटका होणार आहे. कारण, इंडेन गॅसने मिस कॉलवर गॅस सिलिंडर बुकिंग सुरू केले आहे. ही सुविधा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भुवनेश्वरमधील कार्यक्रमात लाँच केली आहे.

इंडियन ऑईल एलपीजीच्या ग्राहकांना 8454955555 या नंबरवर मिस कॉल केल्यावर सिलिंडरची बुकिंग होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यासाठी कॉलिंग दर वगळता कोणतेही शुल्क लागू होणार नाही. त्यापूर्वी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी ग्राहकांना फोनवर बोलण्याची गरज लागणार नाही. या सेवेचा शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांना फायदा होणार आहे.

हेही वाचा-विमान इंधनाच्या किमतीत ३.७ टक्क्यांची वाढ; एलपीजी 'जैसे थे'

धर्मेंद्र प्रधान यांनी जागतिक दर्जाचे वेगवान कारसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रिमियम ग्रेड पेट्रोल दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचे उद्घाटन केले. दुसऱ्या टप्प्यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने एक्सपी १०० कंपनीने दिल्लीसह सात शहरात प्रिमियम पेट्रोल विक्री करण्यास सुरुवात केली आहे. मिस कॉलवर गॅस सिलिंडरची सुविधा लवकरच संपूर्ण देशात सुरू होणार आहे. प्रधान यांनी कार्यक्रमात बोलताना एलपीजी गॅस सिलिंडर हे काही तासात ग्राहकांना द्यावे, असे गॅस एजन्सींना आवाहन केले आहे.

हेही वाचा-' राज्याच्या महसुलात चार महिन्यात ३६७ कोटी रुपयांची वाढ'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.