ETV Bharat / business

लॉकडाऊन : जीवनावश्यक वस्तुंसाठी ६०.९ टक्के भारतीयांना मोजावे लागताहेत जादा पैसे

आयएनएस सी-व्होटर गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन कोरोना ट्रॅकरद्वारे २६ मार्च ते २७ मार्चदरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये जीवनावश्यक वस्तुंसाठी जादा पैसे मोजावे लागतात, का असा प्रश्न विचारण्यात आला. तर ६०.९ टक्के लोकांनी जादा पैसे द्यावे लागत असल्याचे सांगितले. तर २८.७ टक्के लोकांनी जीवनावश्यक वस्तुंसाठी जादा पैसे द्यावे लागत नसल्याची माहिती दिली.

File photo
प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 30, 2020, 7:50 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाचे संकट कममी करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. अशावेळी ६०.९ नागरिकांना जीवनावश्यक वस्तु घेण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहे. ही माहिती एका सर्वेक्षणामधून समोर आली आहे.

आयएनएस सी-व्होटर गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन कोरोना ट्रॅकरद्वारे २६ मार्च ते २७ मार्चदरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये जीवनावश्यक वस्तुंसाठी जादा पैसे मोजावे लागतात, का असा प्रश्न विचारण्यात आला. तर ६०.९ टक्के लोकांनी जादा पैसे द्यावे लागत असल्याचे सांगितले. तर २८.७ टक्के लोकांनी जीवनावश्यक वस्तुंसाठी जादा पैसे द्यावे लागत नसल्याची माहिती दिली. तर उर्वरित लोकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. लोकांनी खरेदी घेण्यासाठी दुकान व मॉलमध्ये गर्दी केल्याने किमती वाढल्या आहेत. काळा बाजार आणि लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तुंची पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे.

हेही वाचा-संचारबंदी परिणाम : ...म्हणून घरगुती गॅस सिलिंडरची मागणी वाढली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चला लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर काही तासातच सुपरमार्केटमधील किराणा माल संपला होता. लॉकडाऊनच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटले. तर मालाची साठेबाजी मोठ्या प्रमाणात झाली

हेही वाचा-कोरोनाचा जगभरात वाढता प्रार्दुभाव; शेअर बाजारात १,३०० अंशांनी घसरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.