नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वी भारतीय मद्यनिर्मिती उद्योगाने मद्य आणि वाईनवरील आयात शुल्क कमी करू नये, अशी सरकारला विनंती केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन मद्यावरील आयात शुल्क कमी करावे, अशी मागणी केली होती. यामध्ये बोर्बन व्हिस्कीचाही समावेश आहे. अमेरिकन मद्यावरील आयात शुल्क कमी केल्यास त्याचा फटका भारतीय मद्यनिर्मिती उद्योगावर होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-'या' कारणांनी चांदीच्या दरात होतेय चढ-उतार; जळगावात प्रति किलो ४७.२०० रुपये
अमेरिकन मद्याला आयात शुल्कात सवलत दिल्यास युरोपियन युनियनकडून तशी मागणी होण्याची शक्यता आहे. मद्यात आयात शुल्कात देवू नये, असे पत्र केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना पुन्हा आणि पुन्हा लिहित आहोत, असे भारतीय मद्य निर्मिती कंपनी महासंघाचे महासंचालक विनोद गिरी यांनी सांगितले. विदेशी कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत सुकर प्रवेश हवा आहे. मात्र, त्याच कंपन्या ज्या देशात आहेत, त्यांच्याकडून जादा आयात शुल्क लादण्यात येत असल्याचे गिरी यांनी सांगितले.
हेही वाचा-धक्कादायक! रेल्वेच्या तात्काळ बुकिंगसाठी बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा वापर