ETV Bharat / business

कोरोनाच्या संकटात विमा दाव्यांची प्रतिपूर्ती करण्याकरिता एलआयसीकडून नियम शिथील

सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीने रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर विमा दावे पूर्ण करण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. मृत्यू प्रमाणपत्राला पर्याय म्हणून डिस्चार्ज समरी, ईएसआय, संरक्षण दल, कॉर्पोरेट हॉस्पिटल आदी यंत्रणांकडून देण्यात येणारे मृत्यू प्रमाणपत्र स्वीकारण्यात येत आहेत.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : May 7, 2021, 10:20 PM IST

मुंबई - भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) कोरोना महामारीमुळे विम्याचे दावे दाखल करताना अनेक नियम शिथील केले आहेत. एलआयसीने विमा दावे दाखल करण्यासाठी प्रक्रिया अधिक सोपी आणि अडचणीविरहित केली आहे.

सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीने रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर विमा दावे पूर्ण करण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. मृत्यू प्रमाणपत्राला पर्याय म्हणून डिस्चार्ज समरी, ईएसआय, संरक्षण दल, कॉर्पोरेट हॉस्पिटल आदी यंत्रणांकडून देण्यात येणारे मृत्यू प्रमाणपत्र स्वीकारण्यात येत आहेत. तर काही प्रकरणात नगरपरिषदांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्रही स्वीकारले जाणार आहे.

हेही वाचा-गोपनीयतेचे धोरण अपडेट नसेल तरी व्हॉट्सअपचे अकाउंट राहणार सुरू

  • एलआयसीकडून व्हिडिओ कॉलद्वारा लाईफ सर्टिफिकेट घेतेले जात आहे. एलआयसीने दाव्यांच्या प्रतिपूर्तीसाठी वेबसाईटवर ऑनलाईन एनईएफटी रेकॉर्ड क्रिएशन आणि सबमिशन पर्यायही दिला आहे.

हेही वाचा-महाराष्ट्रात तिसरी ऑक्सिजन एक्सप्रेस शनिवारी होणार दाखल

दरम्यान, एलआयसी कार्यालयाचे कर्मचारी हे १० मेपासून सोमवारी ते शुक्रवारी सकाळी १० ते साडेपाच वाजेपर्यंत करणार आहेत.

एलआयसीचा आयपीओ यंदा दिवाळीत खुला होणार

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) आयपीओ यंदा दिवाळीत खुला होणार आहे. ही माहिती केंद्रीय निर्गुंतवणूक सचिव तुहीन कांत पांडे यांनी फेब्रुवारीमध्ये दिली होती. केंद्र सरकारने आयपीओ म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंगच्या माध्यमातून एलआयसीमधील भागीदारी विकण्याची घोषणा केली आहे. एलआयसी सध्या १०० टक्के सरकारी कंपनी आहे. आयपीओद्वारे कंपनीची भागीदारी खासगी क्षेत्राकडे जाणार आहे. यातून जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होण्याची अधिक चिन्हे असल्याची भीती एलआयसी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.