मुंबई - नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. कंपनीने (एआयसीएचएफएल) नवीन घरे खरेदी करणाऱ्यांसाठी गृहकर्जाचे व्याजदर कमी करून ७.५ टक्के केला आहे. हा व्याजदर सिबील स्कोअर ८०० आणि त्याहून अधिक असलेल्या ग्राहकांसाठी आहे.
एआयसीएचएफएलचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती म्हणाले, की भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यवस्थेत चलन तरलता वाढविण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. आम्हाला कमी दरात भांडवल मिळत आहे. त्यामुळे हा लाभ ग्राहकापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून ग्राहकांचा या क्षेत्रातील विश्वास वाढविण्यासही मदत होणार आहे.
हेही वाचा-टीव्हीएस मोटार कंपनीकडून कर्नाटकला ३ हजार पीपीईसह १० हजार मास्कची मदत
ज्या ग्राहकांचा सिबील हा ८०० हून कमी आहे, त्यांनाही कर्ज मिळणार आहे. मात्र, त्यासाठी व्याजदर जास्त असणार आहे.
हेही वाचा-कोरोनाचा अर्थव्यवस्थेला 'संसर्ग'; चालू आर्थिक वर्षात ०.८ टक्के विकासदर!ल्याचे त्यांनी सांगितले.