बंगळुरू - कोरोनाचा प्रसार वाढत असताना अनेकांना नियमितपणे कामावर जाण्याची धास्ती वाटू लागली आहे. अशावेळी फ्लिपकार्टने डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना विलिनीकरण कक्षात ठेवावे लागले तर त्यांना कंपनी पूर्ण वेतन देणार आहे.
इन्फ्रारेड थर्मोमीटरचा वापर करून सर्व कर्मचाऱ्यांच्या तापमानाची तपासणी करण्यात येत असल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे. अशी तपासणी सर्व कर्मचारी, पुरवठादार आणि अभ्यागतांना बंधनकारक करण्यात आली आहे. तर फ्लूची लक्षणे दिसणाऱ्या संशयितांना घरी जाण्याचा सल्ला फ्लिपकार्टकडून देण्यात येत आहे.
हेही वाचा-सेबीचा कंपन्यांना मोठा दिलासा; 'हा' घेतला निर्णय
पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स नेटवर्कमध्ये सुमारे ३ हजारांहून अधिक कार्यशाळा घेण्यात आल्याचे ई-कार्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमितेश झा यांनी ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले. डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना जीवन विमासह वैद्यकीय विमा दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा-कोरोनाचा फटका... तब्बल ३.८ कोटी भारतीयांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता
दरम्यान,कोरोनाचा जगभरात प्रसार होत असताना डिजीटल सेवांची मागणी वाढली आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढले आहे.