- किरकोळ विक्री क्षेत्र ( Retail sector in 2021 ) -कोरोनाच्या पहिल्या लाटेतून किरकोळ विक्री सावरत आहे. अशातच वर्षाखेर ओमायक्रॉनची भीती निर्माण झाली आहे. आगामी वर्षात किरकोळ विक्री क्षेत्रासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे असणार आहे. कोरोनाच्या काळात टाळेबंदी आणि महामारीमुळे ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढले. ग्राहकांमध्ये ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढले.
- विमा क्षेत्र ( proposed of LIC IPO ) - केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करताना एलआयसीचा आयपीओ आणण्याचे जाहीर केले आहे. मात्र, मार्च 2022 नंतर एलआयसीचा आयपीओ बाजारात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- रस्ते, वाहतूक आणि महामार्ग ( highway express work in 2021 ) -केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सरकारकडे असलेली जुनी वाहने भंगारात काढण्याची घोषणा केली. दुसरीकडे दिल्ली-मुंबई महामार्ग, बंगळुरू-चेन्नई महामार्ग आणि झोजिला भुयारीमार्ग अशा मोठा प्रकल्पावर केंद्रीय महामार्ग मंत्रालय काम करत आहे. दिल्ली-डेहराडून या महामार्गाचे काम झाल्यास प्रवासातील अंतर लक्षणीय कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
- स्मार्टफोनची बाजारपेठ ( smartphone market in 2021 ) - स्मार्टफोनच्या बाजारात शाओमी आणि सॅमसंगने आघाडी घेतली आहे. त्यानंतर व्हिवो, रिअलमी आणि ओप्पोने बाजारावर पकड मिळविली आहे. तर वनप्लस, सॅमसंग आणि अॅपलला प्रिमीयम ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
- उद्योग प्रोत्साहन योजना ( scheme for Semi conductor ) - डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने सेमी कंडक्टरसाठी 76 हजार कोटींची योजना मंजूर केली. या योजनेमुळे भारत हा उच्च तंत्रज्ञान आणि चिप निर्मितीत गुंतवणूक आकर्षित करेल, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.
- आरोग्य ( Health sector in COVID 19 ) - कोरोना महामारीवर मात करण्यासाठी भारत सरकारने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता दिली. ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांना 16 जानेवारीला मान्यता दिली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांहून अधिक वयाचे नागरिक आणि गंभीर आजारी असलेल्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लस देण्यात आली. लस कंपन्यांनी लशींचे उत्पादन टप्प्याटप्प्याने वाढविले. त्यानंतर केंद्र सरकारने ही लस राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना मोफतपणे उपलब्ध करून दिली. 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांकरिता कोरोना लसीकरणाची मोहिम जाहीर केली आहे. हे लसीकरण 13 जानेवारीला सुरू होणार आहे.
- सोने ( Gold rates in 2021 ) - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोन्याचे दर घसरले. कोरोनाची लाट ओसरताना पुन्हा सोने प्रति तोळा 55 हजारांवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये एमसीएक्समध्ये सोन्याचा दर प्रति तोळा 52 हजारांवर पोहोचला होता. तर सोन्याचा दर बाजारात प्रति तोळा 48 हजारांवर पोहोचला होता. गतवर्षी जानेवारीच्या तुलनेत सोन्याचे दर हे 4 टक्क्यांनी कमी आहेत.
Year Ender Business 2021 : सरत्या वर्षातील 'या' आहेत व्यापारविषयक महत्त्वाच्या घडामोडी - major incidents of Business in year 2021
कोरोना महामारीत किरकोळ विक्री क्षेत्र ( Retail sector in 2021 ), विमा क्षेत्र ( proposed of LIC IPO ), स्मार्टफोनची बाजारपेठ ( smartphone market in 2021 ), आरोग्य ( Health sector in COVID 19 ) या उद्योगांवर परिणाम झाला. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सरकारकडे असलेली जुनी वाहने भंगारात काढण्याची घोषणा केली. जाणून घ्या, अशा महत्त्वाच्या घडामोडी.
Year Ender Business 2021
- किरकोळ विक्री क्षेत्र ( Retail sector in 2021 ) -कोरोनाच्या पहिल्या लाटेतून किरकोळ विक्री सावरत आहे. अशातच वर्षाखेर ओमायक्रॉनची भीती निर्माण झाली आहे. आगामी वर्षात किरकोळ विक्री क्षेत्रासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे असणार आहे. कोरोनाच्या काळात टाळेबंदी आणि महामारीमुळे ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढले. ग्राहकांमध्ये ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढले.
- विमा क्षेत्र ( proposed of LIC IPO ) - केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करताना एलआयसीचा आयपीओ आणण्याचे जाहीर केले आहे. मात्र, मार्च 2022 नंतर एलआयसीचा आयपीओ बाजारात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- रस्ते, वाहतूक आणि महामार्ग ( highway express work in 2021 ) -केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सरकारकडे असलेली जुनी वाहने भंगारात काढण्याची घोषणा केली. दुसरीकडे दिल्ली-मुंबई महामार्ग, बंगळुरू-चेन्नई महामार्ग आणि झोजिला भुयारीमार्ग अशा मोठा प्रकल्पावर केंद्रीय महामार्ग मंत्रालय काम करत आहे. दिल्ली-डेहराडून या महामार्गाचे काम झाल्यास प्रवासातील अंतर लक्षणीय कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
- स्मार्टफोनची बाजारपेठ ( smartphone market in 2021 ) - स्मार्टफोनच्या बाजारात शाओमी आणि सॅमसंगने आघाडी घेतली आहे. त्यानंतर व्हिवो, रिअलमी आणि ओप्पोने बाजारावर पकड मिळविली आहे. तर वनप्लस, सॅमसंग आणि अॅपलला प्रिमीयम ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
- उद्योग प्रोत्साहन योजना ( scheme for Semi conductor ) - डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने सेमी कंडक्टरसाठी 76 हजार कोटींची योजना मंजूर केली. या योजनेमुळे भारत हा उच्च तंत्रज्ञान आणि चिप निर्मितीत गुंतवणूक आकर्षित करेल, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.
- आरोग्य ( Health sector in COVID 19 ) - कोरोना महामारीवर मात करण्यासाठी भारत सरकारने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता दिली. ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांना 16 जानेवारीला मान्यता दिली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांहून अधिक वयाचे नागरिक आणि गंभीर आजारी असलेल्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लस देण्यात आली. लस कंपन्यांनी लशींचे उत्पादन टप्प्याटप्प्याने वाढविले. त्यानंतर केंद्र सरकारने ही लस राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना मोफतपणे उपलब्ध करून दिली. 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांकरिता कोरोना लसीकरणाची मोहिम जाहीर केली आहे. हे लसीकरण 13 जानेवारीला सुरू होणार आहे.
- सोने ( Gold rates in 2021 ) - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोन्याचे दर घसरले. कोरोनाची लाट ओसरताना पुन्हा सोने प्रति तोळा 55 हजारांवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये एमसीएक्समध्ये सोन्याचा दर प्रति तोळा 52 हजारांवर पोहोचला होता. तर सोन्याचा दर बाजारात प्रति तोळा 48 हजारांवर पोहोचला होता. गतवर्षी जानेवारीच्या तुलनेत सोन्याचे दर हे 4 टक्क्यांनी कमी आहेत.
Last Updated : Dec 30, 2021, 10:18 PM IST