बंगळुरू - लॉकडाउन असल्याने जीवनावश्यक वस्तु मिळविण्यासाठी नागरिकांनी देशभरात धडपड सुरू केली आहे. अशा स्थितीमध्ये कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमध्ये किराणा आणि सुपरमार्केट हे २४ तास सुरू राहणार आहेत.
ग्राहकांच्या सोयीकरता किराणा, सुपरमार्केट आणि अन्नधान्यांची दुकाने २४X७ सुरू राहणार आहेत. हा निर्णय कर्नाटकचे पोलीस प्रमुख प्रविण सुड यांनी जाहीर केला. तरी नागरिकांनी गर्दी करू नये, असे त्यांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा-सॅनिटायझरसह सर्व प्रकारच्या व्हेटिंलेटरच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी
बंगळुरू पोलीस आयुक्तांनी ३०० अन्न विक्रेते आणि मेडिकल अॅग्रिगेटरची बैठक घेतली. त्यांचे लोक आणि वाहनांना आधार कार्ड आणि संस्थेच्या पत्रावर आधारित पास देण्यात येणार आहे.
हेही वाचा-गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.८२ लाख कोटींची वाढ : शेअर बाजार सावरल्याचा परिणाम
आठ पोलीस आयुक्तांकडून हे पास दिले जाणार आहेत. पासचे कसे वितरण करण्यात येणार आहे, याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) हेमंत निबांळकर यांनी दिली. वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असलेल्या रुग्णांना संचारबंदीमध्ये परवानगी देण्यात येणार आहे. अनेक लोक कर्फ्यु पासचा गैरवापर करत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. जीवनावश्यक सेवा आणि पुरवठा साखळी सुरू ठेवण्याकरता कठोरपणे अंमलबजावणी करत असल्याचे सूड यांनी सांगितले. सामाजिक अंतर ठेवण्यासाठी आम्हाला मदत करा, असे त्यांनी आवाहन केले.