नवी दिल्ली - जग्वार लँड रोव्हर इंडियाने एफ-पेस एसयूव्हीचे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. या मॉडेलची किंमत ६९.९९ लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. नवी एफ-पेसमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवरट्रेन आहे. २ लिटर पेट्रोल इंजिनची १८४ केडब्ल्यू आणि २ लिटर डिझेलची १५० केडब्ल्यू क्षमता आहे.
जग्वार लँड रोव्हर इंडियाच्या एफ-पेस ही आलिशान कार आहे. त्यामध्ये ग्राहकांना सुपरियर अनुभव मिळू शकणार असल्याचे जेएलआर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोना लशींसह औषधावरील जीएसटी दराबाबत १२ जूनला जीएसटी परिषदेची बैठक
मॉडेलमध्ये २८.९५ सेमीचे कर्व्ह्ड ग्लास एचडी टचस्क्रीन इनफोटेनमेंट सिस्टिम, थ्रीडी सराउंड कॅमेरा, मेरिडीयन ऑडिओ सिस्टिम आहे. जग्वार ही भारतामध्ये एक्सई (किंमत ४६.६४ लाखापांसून पुढे), एक्सएफ (किंमत ५५.६७ लाखांपासून पुढे), आय-पेस (१.०५ कोटीपुढे) आणि एफ-टाईप (९७.९७ लाखांपासून पुढे) किंमत आहे.
हेही वाचा-नायजेरिया सरकारकडून ट्विटर बंद; भारतीय अॅप 'कू'चा वापर सुरू
जेएलआरची देशातील २४ शहरांमध्ये डीलरशीप आहेत.