ETV Bharat / business

गुंतवणुकीपोटी फेसबुककडून जिओला मिळाले 43 हजार 574 कोटी रुपये! - FB & Jio deal

जिओ आणि फेसबुकमध्ये 22 एप्रिलला सौद्याची घोषणा करण्यात आली होती. फेसबुककडून पैसे मिळाल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला दिली आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Jul 8, 2020, 1:42 PM IST

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटातही रिलायन्सची मालकी असलेल्या जिओला गुंतवणूक मिळविण्यात मोठे यश मिळाले आहे. जिओच्या पालक कंपनी रिलायन्स जिओला फेसबुकची कंपनी जाधू होल्डिंग्ज, एलएलसीकडून 43 हजार 574 कोटी रुपये मिळाले आहेत. फेसबुकने जिओमध्ये 9.99 टक्के हिस्सा घेतला आहे. त्यासाठी फेसबुकने रिलायन्सला कोट्यवधी रुपये दिले आहेत.

जिओ आणि फेसबुकमध्ये 22 एप्रिलला सौद्याची घोषणा करण्यात आली होती. फेसबुककडून पैसे मिळाल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला दिली आहे. जिओमधील 9.99 टक्के हिश्शासाठी फेसबुक कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला 4.62 लाख कोटी रुपये देणार आहे.

कोरोनाच्या संकटातही जिओला गुंतवणूकदारांकडून मोठा निधी जमविण्यात यश आले आहे. सर्वात आधी फेसबुकने जिओमध्ये 1.17 लाख कोटी रुपये गुंतविण्याची घोषणा केली होती. जिओमध्ये फेसबुक, पीआयएफ सिल्वर लेक, विस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक, केकेआर मुबादाल,एआयडीआय, टीपीजी आणि एल कॅटर्टन या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.