ETV Bharat / business

ट्रम्प यांचा भारत दौरा केवळ व्यापारच नव्हे तर रणनीतीसाठीही महत्त्वाचा - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष दौरा

दोन्ही देशांमधील संरक्षण, दहशतवादाची समस्या आणि उर्जा क्षेत्र यासाठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचे माजी राजदूत राजीव भाटिया यांनी सांगितले.परराष्ट्रसंबंध तज्ज्ञ राजीव भाटिया यांनी गेली तीस वर्षे भारताच्या विदेशातील महत्त्वांच्या मोहिमांसाठी काम केले आहे. भाटिया हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत आशावादी आहेत.

Donald Trump India Visit
डोनाल्ड ट्रम्प भारत दौरा
author img

By

Published : Feb 24, 2020, 2:42 PM IST

नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मोठा व्यापारी करार होण्याची शक्यता नाही. असे असले तरीही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

दोन्ही देशांमधील संरक्षण, दहशतवादाची समस्या आणि उर्जा क्षेत्र यासाठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचे माजी राजदूत राजीव भाटिया यांनी सांगितले. परराष्ट्रसंबंध तज्ज्ञ राजीव भाटिया यांनी गेली तीस वर्षे भारताच्या विदेशातील महत्त्वांच्या मोहिमांसाठी काम केले आहे. भाटिया हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत आशावादी आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जगातील सर्वात शक्तिशाली नेते आहेत. त्यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचा लक्ष लागलेले असणार, असे भाटिया यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. चीन, दक्षिण आशिया आणि अफगाणिस्तानमध्ये समान दृष्टीकोनातून बांधणी करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट सहाय्यकारी ठरणार आहे.

हेही वाचा-नमस्ते ट्रम्प...! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद विमानतळावर तगडी सुरक्षा

अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश अफगाणिस्तान आणि पाकमधील दहशतवादापासून त्रस्त आहेत. दोन्ही देशांचे प्रदेशातील सुरक्षितता आणि स्थैर्य याबाबत एकमत आहे. प्रशांत महासागरासह दक्षिण चीन महासागरातील संचाराच्या स्वातंत्र्याबाबत अमेरिका आणि भारताचे मतैक्य आहे. याउलट चीनचा शेजारी राष्ट्र जपान, व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशांबरोबर प्रादेशिक मालकीसाठी वाद आहे.

दोन्ही देशांमध्ये १० अब्ज डॉलर एवढा मर्यादित व्यापार करार होईल, असे संकेत आहेत. दौऱ्याला येण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये व्यापार करार होणार नसल्याचे म्हटले होते.

हेही वाचा-नमस्ते ट्रम्प...! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आजपासून भारत दौऱ्यावर, अहमदाबादमध्ये जय्यत तयारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.