नवी दिल्ली - सार्वभौम सुवर्ण रोख्यांची (सोव्हर्जिअन गोल्ड बाँड्स) तिसऱ्या टप्प्यातील किंमत निश्चित करण्यात आली आहे. प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ही ३ हजार ४९९ निश्चित करण्यात आल्याचे वित्तमंत्रालयाने माहिती दिली आहे.
सार्वभौम सुवर्ण रोखे ५ ऑगस्टला खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. तर ९ ऑगस्टला बंद होणार आहेत. ऑनलाईन अथवा डिजीटल देयक प्रणालीचा वापर केल्यास ५० टक्के सवलत देण्यावर सरकार विचार करत आहे. त्या संदर्भात केंद्र सरकार आरबीआयशी बोलणी करत आहे.
असा मिळतो फायदा-
सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेवर व्याज देण्यात येते. तसेच रोखे कर्जासाठी तारण ठेवता येतात.
येथे खरेदी करता येतात सुवर्ण रोखे-
बँक, स्टॉक होल्डिंग कॉरपरेशन ऑफ इंडिया लि. (एसएचसीआईएल), डाकघर, मान्यताप्रात शेअर बाजार
यामुळे सरकारने सुरू केले होते सुवर्ण रोखे-
भारतीयांचा सोने खरेदीकडे असलेला कल लक्षात घेवून मोदी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेला २०१५ मध्ये सुरुवात केली होती. योजनेसाठी फक्त भारतीय नागरिक, धर्मादाय संस्था, कंपन्या, ट्रस्ट आदी अर्ज करू शकतात. एक ग्रॅम सोन्यासाठी एक रोख्यात गुंतवणूक करण्यात येते. भौतिक सोन्याची कमी मागणी होण्यासाठी सरकारकडून सुवर्ण रोखे बाजारात आणण्यात येते.