ETV Bharat / business

देशातील हे शहर आहे, योगाची आंतरराष्ट्रीय राजधानी; अशी केली जाते आर्थिक कमाई

गेल्या काही वर्षात योग हा व्यवसाय म्हणून जगभरात चांगलाच स्थिरावला आहे.  अशा स्थितीत ऋषिकेशमधील योग व्यवसायाची चांगली भरभराट होत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन
author img

By

Published : Jun 21, 2019, 4:00 PM IST

देहरादून - जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असताना, त्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषिकेशमध्ये पर्यटकांचा ओघ वाढत आहे. ऋषिकेश हे उत्तराखंडमधील छोटेसे शहर तीर्थक्षेत्रदेखील आहे. जगभरातील योगप्रेमी लोक येथे योग शिकण्यासाठी येतात.

गेल्या काही वर्षात योग हा व्यवसाय म्हणून जगभरात चांगलाच स्थिरावला आहे. अशा स्थितीत ऋषिकेशमधील योग व्यवसायाची चांगली भरभराट होत आहे. येथे ३०० योग शाळा आहेत. तसेच अनेक योग प्रशिक्षण केंद्रे ही विकसित झाली आहेत. केवळ भारतामधीलच नव्हे तर जगभरातून आबालवृद्ध योग शिकण्यासाठी ऋषिकेशमध्ये येतात. ऋषिकेशमधील अनेक योग संस्था प्रशिक्षण देवून प्रमाणपत्र देतात. त्यामुळे योग म्हणजे रोजगाराचे माध्यम झाले आहे.

योग गुरू महर्षी महेश योगींनी मिळवून दिली योगाला प्रसिद्धी-
योग गुरू महर्षी महेश योगी हे ऋषिकेशमधील योग केंद्राचे संस्थापक आहेत. ते राम झुलाजवळील योग केंद्रात मोठ्या प्रमाणात विदेशातील विद्यार्थ्यांना शिकवितात. त्यांनी भारतीय योगाला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. तसेच प्राचीन योगाचे तत्वज्ञान जागतिक पातळीवर पोहोचविले आहे.

जगभरात २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. असे असले तरी दरवर्षी १ ते ७ मार्चदरम्यान येथे योग महोत्सव साजरा करण्यात येतो. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी विदेशातून हजारो पर्यटक ऋषीकेशमध्ये दाखल होत असतात.

असे आकारले जाते शुल्क-
सामान्यत: योग केंद्रात प्रशिक्षणासाठी प्रति तासाला १०० ते २०० रुपये शुल्क आकारण्यात येते. तर व्यावसायिक प्रशिक्षणासाठी १५ ते ४५ दिवसासाठी अभ्यासक्रम घेण्यात येतो. त्यासाठी ४० हजार ते १ लाख ५० हजारापर्यंत शुल्क आकारण्यात येते.

देश-विदेशातून योग शिकण्यासाठी येणाऱ्या योगप्रेमींमुळे ऋषीकेश येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीली चालना मिळाली आहे. योग दिनामुळे अनेक हॉटेल आणि टॅक्सीसारख्या सेवांची पर्यटकांनी आगाऊ नोंदणी केली आहे. त्यामुळे स्थानिकांना व्यवसाय करण्याची चांगली संधी मिळत आहे. योगामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. अशा योगामुळे ऋषीकेश शहराचे आर्थिक आरोग्य चांगलेच मानवले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.