ETV Bharat / business

विरशो बायोटेक स्पुटनिक व्हीच्या २० कोटी लशींचे करणार उत्पादन

आरडीआयएफ आणि विरशो बायोटकमधील तंत्रज्ञानाचे हस्तांतरण हे चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत पूर्ण होणार असल्याचे दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. स्पुटनिक व्हीचा आंतरराष्ट्रीय भागीदारांना पुरवठा करण्यासाठी विरशो बायोटकची क्षमता उपयोगी पडणार आहे.

Sputnik V
स्पुटनिक व्ही
author img

By

Published : Mar 22, 2021, 5:43 PM IST

नवी दिल्ली - रशियन थेट गुंतवणूक निधी (आरडीआयएफ) आणि हैदराबादस्थित विरशो बायोटेकने कराराची घोषणा केली आहे. या करारानुसार विरशो बायोटेक स्पुटनिक व्ही या लशीचे २० कोटीपर्यंत भारतामध्ये उत्पादन घेण्यात येणार आहे.

आरडीआयएफ आणि विरशो बायोटकमधील तंत्रज्ञानाचे हस्तांतरण हे चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत पूर्ण होणार असल्याचे दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. स्पुटनिक व्हीचा आंतरराष्ट्रीय भागीदारांना पुरवठा करण्यासाठी विरशो बायोटकची क्षमता उपयोगी पडणार आहे.

हेही वाचा-'स्पूटनिक व्ही' मार्चमध्ये लाँच करण्याचा डॉ. रेड्डीजचा प्रयत्न

  • आरडीआयएफचे सीईओ किरील डमीट्रेइव्ह म्हणाले की, विरशो बायोटेकबरोबरील करार हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच आंतरराष्ट्रीय भागीदारांना लशीचा पुरवठा करण्यासाठी हा करार महत्त्वाचा आहे.
  • विरशो बायोटेकचे एमडी तुम्मुरू मुरली म्हणाले की, आम्हाला स्पूटनिक व्ही लशीचे उत्पादन करण्यासाठी आरडीआयएफबरोबर करार करताना आनंद होत आहे. विरशोने मोठ्या प्रमाणात औषधांचे उत्पादन करण्याची क्षमता सिद्ध केली आहे.
  • देशामध्ये १९ मार्चला आरडीआयएफ आणि स्टेलिस बायोफार्माबरोबर २० कोटी स्पूटनिक व्ही लशीचे उत्पादन घेण्यासाठी करार करण्यात आला आहे.
  • जगातील सर्वात जुनी वैद्यकीय संशोधनपत्रिका असलेल्या लॅन्सेटच्या वृत्तानुसार स्पूटनिक व्ही ही कोरोना विषाणुच्या लढ्यात ९१.६ टक्के कार्यक्षम आहे.

हेही वाचा-स्पुटनिक-५ : भारतातील दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी; तिसरा टप्पा लवकरच सुरू

देशात ३० कोटी डोसच्या उत्पादनाचे उद्दिष्ट-

रशियन कोरोना विषाणूविरोधी लस स्पुटनिक व्हीच्या सुमारे ३० कोटी डोसची निर्मिती करेल, अशी माहिती रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) डिसेंबर २०२० मध्ये शुक्रवारी दिली होती. देशातील चार मोठ्या उत्पादकांसह यासाठीची व्यवस्था केली गेली आहे. त्यासाठी १० उत्पादने साइटस निवडल्या गेल्या आहेत, अशी माहितीही देण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.