नवी दिल्ली – वंदे भारत मोहिम आणि बबल्समधील विमान वाहतुकीसाठी भारत सरकारने नवीन नियम निश्चित केले आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विमान प्रवासाचा खर्च प्रवाशांना उचलावा लागणार आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व प्रवाशांना बोर्डिंगवर येण्यापूर्वी थर्मल स्क्रीनिंगमधून जावे लागणार आहे. केवळ आजाराची लक्षणे नसलेल्या प्रवाशांना बोर्डिंगसाठी परवानगी देण्यात येणार आहे. कोणत्या प्रवाशांना देशात अथवा देशाबाहेर प्रवास करता येईल, याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे. पात्र असलेल्या प्रवाशांना केंद्रीय नागरी विमान वाहतुकीच्या एजन्सीमध्ये अर्ज करावा लागणार आहे. त्यामध्ये प्रवाशांना सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे.
मास्क घालणे, हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे याबाबत विमानातील क्रू आणि विमान प्रवाशांना काळजी घ्यावी लागणार आहे. वंदे भारत मोहिमेमधील प्रवाशांनाही नोंदणी करावी लागणार आहे. बबल्समधी विमान वाहतुकीसाठी प्रवाशांना नोंदणी करावी लागणार आहे. मार्गदर्शक संहिता आणि क्वारंन्टाईनच्या नियमांच्या पालनावर आरोग्य मंत्रालय देखरेख ठेवणार आहे. दरम्यान, भारताने वंदे भारत मोहिमेमधून विदेशातून 11 लाख 23 हजार नागरिकांना मायदेशी आणले आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले, की वंदे भारत मोहिम ही पाचव्या टप्प्यात सुरू आहे. 22 देशांमधून नागरिकांना मायदेशी आणले जात आहे.