ETV Bharat / business

प्राप्तिकर विभागाची ई-फायलिंग वेबसाईट होणार आज लाँच; वाचा सविस्तर माहिती

author img

By

Published : Jun 7, 2021, 3:35 PM IST

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) माहितीनुसार www.incometax.gov.in ही वेबसाईट आणि पोर्टल एकत्रिपणे प्राप्तिकर परतावा (आयटीआर) भरण्याच्या प्रक्रियेसाठी वेगवान पद्धतीने कार्यरत राहणार आहे. प्राप्तिकर विभागाची नवीन वेबसाईट आज लाँच होणार आहे.

IT Department
प्राप्तिकर विभाग

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाची नवीन ई-फायलिंग वेबसाईट सोमवारी (आज) लाँच होणार आहे. त्यामध्ये करदात्यांना वेबसाईटचा अधिक चांगला आणि सोपा लूक दिसणार आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) माहितीनुसार www.incometax.gov.in ही वेबसाईट आणि पोर्टल एकत्रिपणे प्राप्तिकर परतावा (आयटीआर) भरण्याच्या प्रक्रियेसाठी वेगवान पद्धतीने कार्यरत राहणार आहे.

हेही वाचा-अदार पुनावाला यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांसह परराष्ट्रमंत्र्यांचे मानले आभार, कारण...

एकाच डॅशबोर्डवर करदात्यांना दिसणार अपडेट

प्राप्तिकर विभागाची नवीन वेबसाईट आज लाँच होणार आहे. नवीन ई-फायलिंग वेबसाईट ही आधुनिक, अंखड आणि सोयीस्कर अनुभव देणारी असेल, असे सीबीडीटीने म्हटले आहे. करदात्यांना मदत करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात मोबाईल अॅपही लाँच करण्यात येणार आहे. पोर्टलवर सर्व इंटरअॅक्शन्स आणि अपलोड्स व कोणतीही अॅक्शन प्रलंबित असेल तर एकाच डॅशबोर्डवर करदात्यांना दिसणार आहे.

हेही वाचा-देशाच्या राजधानीत बेरोजगारीने गाठला कळस; मेमध्ये 45.6 टक्क्यांची नोंद

नवीन पोर्टलमुळे करदात्यांना लवकर परतावे मिळण्याची प्रक्रिया होणार

प्राप्तिकर परतावे भरण्याचे सॉफ्टवेअर मोफतपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये आयटीआर 1, आयटीआर 2, आयटीआर 3 आणि आयटीआर 4 परतावे भरण्यासाठी प्रश्नावली असणार आहे. करदात्यांना आयटीआर 3, 5, 6 व 7 भरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन पोर्टलमुळे करदात्यांना लवकर परतावे मिळण्याची प्रक्रिया होणार असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.

हेही वाचा-टेस्लानंतर अमेरिकेची दुसरी इलेक्ट्रिक कंपनीही भारतात येणार- नितीन गडकरी

करदात्यांचे प्रोफाईलही ठेवता येणार अद्ययावत-

करदात्यांना त्यांचे वेतन, मालमत्ता आणि व्यवसायाची माहिती देऊन प्रोप्राईल अद्ययावत ठेवता येणार आहे. याशिवाय करदात्यांना कॉलसेंटरच्या माध्यमातून शंकांची उत्तरे दिली जाणार आहेत. ही माहिती व्हिडिओ, चॅटबॉट अथवा लाईव्ह एजंटच्या माध्यमातून दिली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.