बीजिंग - नव्या पिढीतील तंत्रज्ञान असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत मोठी चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. चीनची आघाडीची टेक कंपनी हुवाई ही इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करण्याचे नियोजन करत आहे. या इलेक्ट्रिक कारच्या विविध मॉडेलचे वर्षाखेर लाँचिंग शक्यता आहे.
जीएसएम एरिनाच्या माहितीनुसार हुवाईचे प्रमुख रिचर्ड यू यांनी इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे. हुवाई मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बाजारपेठेत विस्तार करणार आहे. रिचर्ड यू यांच्या नेतृत्वात हुवाईने स्मार्टफोनच्या जगात उल्लेखनीय प्रगती केली आहे. इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या संयत्रांचा वापर करण्यासाठी हुवाईने सरकारकडे बौद्धिक संपदा हक्क असलेल्या चंगान ऑटोमोबाईल आणि इतर वाहन उत्पादकांशी चर्चा सुरू केली आहे. याचबरोबर हुवाई इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनसाठी चीन सरकारकडून मदत करण्यात येणाऱ्या बीआयईसी ग्रुपच्या ब्ल्यूपार्क न्यू एनर्जी टेक्नॉलॉजीशीही चर्चा करत आहे.
हेही वाचा-सुवर्ण रोखे खरेदी करण्याची संधी; प्रति ग्रॅम ४,६६२ रुपये किंमत निश्चित
सिओमी हीदेखील इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनासाठी उत्सुक
चीनची आघाडी टेक कंपनी सिओमी हीदेखील इलेक्ट्रिक कारचे उत्पादन घेण्याचे नियोजन करत आहे. हा एक रणनतीपूर्वक निर्णय असल्याचे मानले जात आहे. मात्र, अद्याप सिओमी इलेक्ट्रिक कारचे उत्पादन कसे करणार आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकल्पाचे नेतृत्व शाओमीचे सीईओ लीई जून सांभाळणार आहेत. वर्ष २०१३ मध्ये लीई जून यांनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची भेट घेण्यासाठी दोनवेळा अमेरिकेचा दौरा केला होता. त्यांना इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात अधिक स्वारस्य निर्माण झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा-खादी ग्रामोद्योगाची झेप; आठच महिन्यात ऑनलाईन विक्रीतून १.१२ कोटींची उलाढाल
काय आहे भारतामधील इलेक्ट्रिक बाजारपेठेची स्थिती?
- भारतीय बाजारपेठेमध्ये स्मार्ट वाहनांची मागणी वाढली आहे. टाटा, महिंद्रा आणि इतर ऑटो कंपन्यांनीही इलेक्ट्रिक वाहनेही बाजारपेठेत लाँच केली आहेत.
- इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सीएसी ई-गव्हर्न्स सेतू सुविधा केंद्राने रुरल ई-मोबिलीटी प्रोग्रॅम नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेमधून कार्बनचे प्रदूषण कमी होणार आहे.
- केंद्र सरकारने देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहनांचेही कार्यालयही बंगळुरूमध्ये सुरू करण्यात आले आहे.
- सरकारी कंपनी ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेडने (ईईएसएल) बीएसएनएलबरोबर सामंजस्य करार केला आहे. सार्वजनिक ठिकाणी ई-मोबिलिटीसाठी लागणारे चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.
- ईईएसएलने बीएसएनएलच्या १ हजार जागांवर चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे. यामध्ये संपूर्ण देशभरात टप्प्याटप्प्यात चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत. ईईएसएल सेवा देण्यासाठी गुंतवणूक करणार आहे